अमृतसागर निवडणूक-
कृषिभूषण सौ.पोखरकर यांचा अर्ज वैध

अकोले- अमृतसागर सहकारी दूध व्यवसायिक व प्रक्रिया संघ लि, अकोलेच्या संचालक मंडळाच्यानिवडणूकीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु होत असून ९५ पैकी ९३ अर्ज वैध ठरविण्यात आले होते
तर दोन उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दिपक पराये यांनी अवैध ठरविले होते. मात्र कोतूळ येथील प्रयोगशील महिला शेतकरी कृषिभूषण सौ. कुमुदिनी पोखरकर यांनी विभागीय उपनिबंधक (दुग्ध) नाशिक यांचेकडे अपिल केले होते. आज शक्रवारी त्यांनी सर्व बाजु एकुण व समजुन घेवून सौ. पोखरकर यांचा उमेदवारी अर्ज वैद्य ठरविला.
सौ. पोखरकर यांनी महिला राखीव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.उमेदवारी यादीत नाव नसल्याचे कारणाने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अर्ज अवैद्य ठरविला होता. मात्र कायद्यातील तरतुदीनुसार त्यांचा अर्ज वैद्य ठरला. याकामी प्रसिध्द कायदेतज्ञ अॅड. वसंतराव मनकर यांनी काम पाहिले.
कृषीभूषण सौ. कुमुदिनी पोखरकर यांचा तालुक्यात गोतावळा मोठा असून जनसंपर्क चांगला आहे. त्यांचा अर्ज वैद्य ठरल्याने त्यांची उमेदवारी औत्सुक्याचा विषय ठकणार आहे.