शिरूर तालुका राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी अर्जुन बढे बिनविरोध

शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी अर्जुन बढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन शिरूर येथे झालेल्या बैठकीत तसे निवडीचे पत्र त्यांना जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी दिले.
यावेळी जिल्हाकार्यकारणी शरद पुजारी,शिरूर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे,माजी तालुकाध्यक्ष जालिंदर आदक,हवेली तालुकाध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे,उपाध्यक्ष सुनिल पिंगळे, भाऊसाहेब खपके,योगेश भाकरे,माजी शहराध्यक्ष अप्पासाहेब ढवळे,मंदार तकटे,सुर्यकांत शिर्के,बबन वाघमारे,आकाश भोरडे, हवेली तालुका उपाध्यक्ष गणेश धुमाळ,दिनकर जोगदंड, सुखदेव सुरवसे आदिंसह तालुक्यातील पत्रकार यावेळी उपस्थित होते.
शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, नगरपरिषदेचे सभागृहनेते प्रकाश धारिवाल,शहर भाजपाचे कार्याध्यक्ष मितेश गादिया,राष्ट्रवादी लिगल सेलचे शहराध्यक्ष रविंद्र खांडरे यांसह नागरिकांनी तालुकाध्यक्षपदी बढे यांची निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
शिरूर तालुका पत्रकार संघाच्या सचिवपदी अर्जुन बढे यांनी गेले दहा वर्ष काम केलेले असुन त्यांनी पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील भैरवनाथ देवस्थानचे पाच वर्ष अध्यक्षपद भूषविले आहे.पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे,तालुका संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पत्रकारांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना नवनियुक्त तालुकाध्यक्ष अर्जुन बढे यांनी सांगितले.