भाविकांची शनिशिंगणापूरात मोठी गर्दी !

मध्यप्रदेश चे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी घेतले शनिदर्शन
विजय खंडागळे
सोनई प्रतिनिधी
सरत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाच्या सुरुवात शनिभाविकानी शनिदर्शनाने दिनचार्याला सुरुवात केली. या वेळी अनेक भाविकांनी शुभ मुहूर्तावर संकल्प केला.
काल पासून शनिभाविकाची गर्दी हळूहळू वाढत जाऊन। नववर्षात मोठी गर्दी पहावयास मिळाली.या मध्ये राजकिय, धार्मिक, सामाजिक,सिनेसृष्टीतील कलाकार,व राज्याच्या कानाकोपऱ्यातुन भाविक शनिशिंगणापूरात दर्शनासाठी दाखल झाले होते. मात्र शासन निर्णय नुसार कोरोनाचा नियम धाब्यावर बसवून मंदिर परिसरात फिरत होते त्यामुळे कोरोना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शनी मंदिर फुलांनी आकर्षक रोषणाई करून सजवले होते.
मध्यप्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण हे सालाबादप्रमाणे कुटुंबासमवेत शनिअभिषेक करून शनिदर्शन घेतले.यावेळी मुख्यमंत्री ताफ्याला वाहतुकीचाही मोठा सामना करावा लागला. मुख्यमंत्री शिवराज चव्हाण व आदर्श गाव हिवरे बाजारचे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले सरपंच पोपट पवार यांना देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, विश्वस्त अप्पासाहेब शेटे,सरचिटणीस बाळासाहेब शेटे,यांनी सन्मानित केले.
वाहतुकीची तीन तेरा
दिवसभरात ठीक ठिकाणी उसाच्या बैलगाड्या,ट्रॅक्टर, वाहने ,व येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची रहदारीने मोठी गर्दी होऊन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक खोळं ब्याने पोलीस प्रशासन विरुद्ध नाराजी व्यक्त केली जात होती.
.कोरोना विषयी सूचना
देवस्थानचे वतीने दिवसभर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना मार्गदर्शन, नियमाचे पालन विषयी सूचना केल्या जात होत्या.