राजूर येथील श्री गुरुदत्त मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील राजूर येथील श्री गुरुदत्त मंदिरात ४८वा अखंड हरिनाम सप्ताह शुभारंभ माजी आमदार वैभव पिचड तसेच गुरुदत्त मंदिराचे विश्वस्त सौ.हेमलता पिचड,योगी केशव बाबा चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आला
यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त,ग्रामस्थ उपस्थित होते.तर यावेळी श्री दत्त मंदिरात ,श्री गणेशाची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली.प्रसंगी बोलताना माजी आमदार वैभव पिचड म्हणाले राजूर हे आदिवासी भागाचे मुख्य केंद्र असून श्री गुरुदेव दत्त मंदिरात गेली ४८ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात येते.या कार्यक्रमास राज्यातील मान्यवर कीर्तनकार प्रवचनकार उपस्थिती लावतात हिंदू समाजाबरोबर मुस्लिम समाज या सप्ताहात सहभागी होऊन हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवतात. मंदिराचे ट्रस्ट तसेच आमच्या मातोश्री सौ.हेमलता ताई पिचड या मंदिरासाठी ,उभारणीसाठी व सप्ताह साठी अथक प्रयत्न करतात येथे ज्ञानेश्वरी पारायण होते.श्री दत्त जयंतीला महाप्रसाद कार्यक्रम होतो.
या वर्षीचे हे ४८ वे वर्ष असून सर्व भाविकांनी ग्रामस्थांनी या सप्ताहात सहभागी व्हावे असे आव्हान त्यांनी केले.तर माजी सरपंच सौ.हेमलता पिचड यानी गाव बांधिलकीतून हा सप्ताह दरवर्षी नित्य नियमाने केला जातो आदिवासी भागातील भजनी मंडळ दररोज आपली हजेरी लावतात महिलांचा या कार्यक्रमास उपस्थित अधिक असते.
यावेळी योगी केशव बाबा ,कुलकर्णी यांनी पौरहित्य करून श्री गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली .माजी आमदार पिचड यांच्या हस्ते आरती करून सप्ताह शुभारंभ झाला.उपसरपंच संतोष बनसोडे,माजी उपसरपंच गोकुळ कानकाटे,माधव गभाले,अविनाश बनसोडे,अरविंद देशमुख,दौलत देशमुख,देविदास शेलार,हभप शिवनाथ भागवत,निजाम तांबोळी,मुमताज तांबोळी , आयुब तांबोळी,मुस्ताक शेख आदी हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.