राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दिनांक 02/01/ 2022

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष १२ शके १९४३
दिनांक :- ०२/०१/२०२२,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०३,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०४,
शक :- १९४३
संवत्सर :- प्लव
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- मार्गशीर्ष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अमावास्या समाप्ति २४:०४,
नक्षत्र :- मूळ समाप्ति १६:२३,
योग :- वृद्धि समाप्ति ०९:४२, ध्रुव २९:२९,
करण :- चतुष्पाद समाप्ति १३:५३,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- धनु – पूर्वाषाढा,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- अनिष्ट दिवस,

राहूकाळ:- संध्या. ०४:४१ ते ०६:०४ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:४८ ते ११:११ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ११:११ ते १२:३३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०१:५६ ते ०३:१८ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
दर्श-वेळा अमावास्या, अन्वाधान,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष १२ शके १९४३
दिनांक = ०२/०१/२०२२
वार = भानुवासरे(रविवार)

मेष
धार्मिक वा आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नवीन ज्ञान गोळा करण्याकडे कल राहील. अनेक प्रश्नांची उकल काढता येईल. स्वत:साठी वेळ काढावा. तज्ञ लोकांशी संपर्क साधावा
.

वृषभ
आरोग्याची काळजी घ्यावी. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. स्त्रीवर्गाशी जरा जपून वागावे. सहकाऱ्यांशी सामंजस्याने वागावे. उगाचच हुरळून जाऊ नका.

मिथुन
आजचा दिवस ताजातवाना असेल. नवविवाहिताना सरप्राइज मिळेल. व्यवसायिकांना चांगला फायदा मिळेल. वरिष्ठांकडून दाद मिळेल. चारचौघात कौतुक केले जाईल.

कर्क
विरोधकांपासून सावध राहावे. छुपे शत्रू त्रास देऊ शकतात. वाहन चालवताना काळजी घ्यावी. योग साधना करावी. मनाच्या चंचलतेला आवर घालावी.

सिंह
व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस फलदायी असेल. नवीन संधी चालून येईल. विद्यार्थ्यांना नवीन आव्हान स्वीकारता येईल. तुमची एकाग्रता वाढेल. जोडीदाराला खुश ठेवता येईल
.

कन्या
जमिनीशी संबंधित व्यवहार पार पडेल. कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम पहायला मिळतील. घरातील लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. साफसफाईची कामे काढाल. मन प्रसन्न राहील
.

तूळ
पराक्रमात वाढ होईल. तुमची ऊर्जा पाहून लोक अचंबित होतील. सहकारी वर्ग तुमच्यावर प्रभावित होईल. कामासंबंधी प्रवास करावा लागेल. ओळखीचे लोक भेटतील
.

वृश्चिक
देणी फेडता येतील. तसेच नवीन गुंतवणूक करता येईल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. बोलण्यात गोडवा ठेवाल. आवडीच्या गोष्टी कराल.

धनू
बुद्धीच्या जोरावर नवीन कामे कराल. दिवस मनाजोगा घालवाल. आवडते छंद जोपासाल. मानसिक दृष्ट्‍या सक्षम व्हाल. धार्मिक कामात सहभागी व्हाल.

मकर
प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. वायफळ खर्च केला जाऊ शकतो. जुन्या विचारात अडकून राहू नका. नकारात्मकता दूर सारावी. दूरच्या नातेवाईकाशी संपर्क होईल.

कुंभ
विविध स्तरातून लाभ संभवतो. मनातील इच्छा पूर्ण कराल. जवळच्या मित्रांची गाठ घ्याल. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकेल. शेअर बाजारातून नफा मिळवू शकाल.

मीन
रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच वैयक्तिक काम तडीस न्याल. वडीलांशी संबंध सुधारतील. कामात चंचलता आड आणू नका. हातातील कामातून समाधान मिळेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button