अंधश्रद्धा व वाईट चालीरीतींना थारा देऊ नका, शिक्षण घेऊन विज्ञान जाणून घ्या — जादूगार हांडे

अकोले प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून अभिवादन केले.
त्यानिमित्ताने प्रसिद्ध जादूगार पी बी हांडे यांचे रहस्य चमत्काराचे हे अंधश्रद्धा निर्मूलनपर सप्रयोग व्याख्यान घेण्यात आले .यावेळी व्यासपीठावर हेमलताताई पिचड, मंदाकिनी हांडे ,मंगलदास भवारी, शांताराम काळे भाऊसाहेब मंडलिक, गोकुळ कानकाटे ,के टी मंडलिक हे होते
खूप अभ्यास करा आयुष्यातील विज्ञान जाणून घ्या. आयुष्यात वाईट चालीरीती, अंधश्रद्धा यांना धारा देऊ नका. शिक्षण घेऊन त्यातील विज्ञान जाणून घ्या. समाजाला जागरूक करा.कार्यक्रम चालू असताना त्यांनी विद्यार्थ्यांनाही सहभागी करून अतिशय मनोरंजक पद्धतीने अंधश्रद्धेला वापरले जाणारी खोटी कारणे कशी फसवी असतात हे स्पष्ट करून सांगितले. अंधश्रद्धा मुक्त व्हा असे आवाहन जादूगार पी बी हांडे यांनी केले .
यावेळी जादुगार हांडे यांच्या पत्नी मंदाकिनी हांडे यांनीही विद्यार्थ्यांना प्रबोधनपर गीते म्हणून जनजागृती केली, विद्यार्थ्यांनीही त्यांच्यासोबत ठेका धरून गाण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अध्यक्षा हेमलताताई पिचड यांनी महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यांचे प्रेरणादायी विचार सांगून प्रबोधनपर” रहस्य चमत्काराचे” कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, शेखर वालझाडे ,के टी मंडलिक, देविदास शेलार, दीपक वैद्य इतर पालक व विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते .यावेळी प्रास्ताविक प्राचार्या मंजुषा काळे यांनी केले. सूत्रसंचालन विनायक साळवे यांनी केले तर आभार सतीश काळे यांनी मानले.