माजी मंत्री गडाख यांच्या नेतृत्वाखाली माका गावचा सर्वांगीण विकास करणार- उषा सत्यवान पटेकर

नेवासा प्रतिनिधी
राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली व जगदंबा विकास पॅनल च्या माध्यमातून माका गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे माका ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदाचे उमेदवार उषा सत्यवान पटेकर यांनी सांगितले
त्यानी पुढे सांगितले की नेवासे तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 1 चिंचबन ग्रामपंचायत बिनविरोध झाली असुन,तालुक्यातील उर्वरित 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत , जिल्ह्यात व तालुक्यात महत्वाची असणारी माका ग्रामपंचायतीच्या निवडणुक सुरू आहे या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली जगदंब विकास पॅनलचा उमेदवार माका ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात आहेत या निवडणुकीत मी स्वतः सरपंच पदासाठी उमेदवारी करत आहेत जगदंबा विकास पॅनल चे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत मी स्वतःही या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे जनतेच्या आशीर्वाद आपल्या सोबत आहे यामुळे मी गावच्या विकासाचा चांगला आराखडा तयार करून गावचा सर्वांगीण विकास करणार आहे यासाठी सर्वांनी या निवडणुकीत साथ द्यावी असे आवाहन उषा पटेकर यांनी केले आहे
,गावची जवळपास लोकसंख्या ९ते १० हजाराच्या आसपास असतानाही, गतकाळात गावात तसेच वाडी वस्त्यांवरील पिण्याचे पाणी, शेती,, विज विषयी तसेच सिंगल फेजआरोग्य विषयक, शेतीसंबधितचे प्रश्न, सुटले नाही विषेषतः शालेय शिक्षण विषयक धोरणं,व यासंबंधी दर्जा सुधारण्याचे काम, गावात तंटामुक्तीसमितीची स्थापना करून वाद मिटवण्या संबधित तसेच महत्वपुर्ण धोरण की, गावातील कायमस्वरुपीच्या प्रस्थापीत घराणेशाही, दंडुकेशाही मोडीत काढून सर्वसामान्य जनहिताचे निर्णय घेण्यात येतील असे सांगत.
माका गावातील प्रस्थापितांची हुकमशाही तसेच दडपशाही मोडीत काढून गावात लोकशाही आणायची आहे. सध्यातरी विशिस्ट कुटुंबाची सत्ता असुन पैसेतुन सत्ता व सत्तेतुन पैसे कमवत असताना, सर्वसामान्यांना या संबंधी त्रासही होत असल्याने सत्ता ही गोरगरिबांच्या हातात देवुन लोकशाहीचा मार्ग अवलंबणार आहे. असल्याचे सरपंच पदाचे उमेदवार उषा सत्यवान पटेकर यांनी सांगितले
…