पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई! 15 लाखाचा मुद्देमाल जप्त

दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर वर कारवाई करत पारनेर पोलिसांनी 15 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे आज सोमवारी सकाळी सात वाजता ही कारवाई करण्यात आली
याबाबत पो.कॉ श्रीनाथ नवनाथ गवळी यांनी सरकारी फिर्याद दिली यात म्हटले आहे की . दिनांक 19/12/2022 रोजी सकाळी 07/00 वा.चे सुमारास मी व सहा. पो. नि. विजय ठाकुर असे टाकळी ढोकेश्वर दुरक्षेत्र येथे हजर असताना सपोनि ठाकुर सो यांना गुप्त बातमी दारामार्फत माहीती मिळाली की, ढोकेश्वर कडुन एक विना नंबर चा ढंपर चोरुन वाळुची अवैधरित्या वाहतुक करीत आहे. अशी माहीती मिळाल्याने लगेच सपोनि ठाकुर सो व मी खात्री करण्यासाठी खाजगी वाहणाने रवाना होवुन नितिन साहेबराव बांडे यांचे घराजवळ जावुन थांबलो असता ठिक 07.20 वा समोरुन एक पांढ-या रंगाचा विना नंबर चा ढंपर येताना दिसला. त्यास सपोनि ठाकुर थांबविण्याचा इशारा करुन थांबविले. त्यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल बाबाजी तळेकर वय 25 वर्षे धंदा ड्रायव्हर रा. वासुंदे ता. पारनेर जि. अहमदनगर असे सांगुन गाडीत काय आहे असे विचारल्यावर त्याने वाळु असल्याचे सांगितले.
त्यानंतर सपोनि ठाकुर यांनी स्वतः गाडी वर चढुन खात्री केली असता त्यामधे अंदाजे चार ब्रास वाळु दिसुन आली. त्यानंतर त्यास वाळुचा परवाना असलेबाबत चौकशी केली असता त्याने माझ्या कडे कुठलाही परवाना नसल्याचे कळविले त्यानंतर मालकाचे नाव विचारले असता त्याने हे वाहन हे माझे स्वतःचे असल्याचे सांगितले. त्यावर गाडीचा नंबर विचारले असता त्याने गाडी क्र.एम.एच-02 एफ. जी 9813 असा असल्याचे सांगितले.
त्यानंतर सपोनि ठाकुर यांनी मला दोन पंच सोबत घेवुन येण्यास कळविले असता लगेच मी पंच 1. नितीन साहेबराव बांडे वय 33 वर्षे धंदा शेती रा. टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर जि. अहमदनगर 2. साहेबराव भिमाजी बांडे वय 65 वर्षे धंदा शेती ता. पारनेर जि. अहमदनगर यांना
बोलावुन घेवुन त्यांना नमुद बातमीची हकीगत समजावुन सांगीतली. व पंच आमचे सोबत येण्यास तयार झाले. मी व पंच तेथे गेल्यावर त्यास आम्हां पोलीसांची व पंचाची ओळख सांगुन पंचा समक्ष झडती घेतली असता त्याचे कब्जात
खालील वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला तो.
3) 15,00,000/- रु.कि.चा विना नंबरचा टाटा कंपनीचा 1618 मॉडेलचा पांढ-या रंगाचा ढंपर जु.वा. किं. अं 16,000/- रु. किं.चि अंदाजे चार ब्रास वाळु कि.अं.
4)
15,16,000/- रु. एकुणयेणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा वाळुने भरलेला विनानंबर चा ढंपर मिळुन आल्याने तिची विनापरवाना बेकायदा चोरी करुन तिची स्वत:चे आर्थिक फायदया करीता विक्री करण्यासाठी जात असताना सदर इसम मिळुन आल्याने त्यास थांबवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव विशाल बाबाजी तळेकर वय- 25 वर्षे धंदा ड्रायव्हर रा. वासुंदे ता. पारनेर जि. अहमदनगर असे सांगितले. सपोनि/ ठाकुर यांनी दोन पंचा समक्ष जागीच पंचनामा करुन जप्त मुद्देमाल व गुन्हयातील वाहण व विशाल बाबाजी तळेकर वय 25 वर्षे धंदा-ड्रायव्हर रा. वासुंदे ता. पारनेर जि. अहमदनगर याचे विरुद्ध . वर गुन्हा दाखल केला आहे