इतर

वीजवितरण च्या अधिकाऱ्यांच्या गैर कारभाराची चौकशी करा सरपंचा ने  दिला उपोषणाचा इशारा

कोतुळ प्रतिनिधी   

 वीज वितरण राजुर चे   सहाय्यक अभियंता श्री विवेक मेवाड व ब्राह्मणवाडा चे कक्ष अभियंता श्री घोलप यांच्या गैरकारभाराची चौकशी करावी या मागणीसाठी चैतन्यपूर् ग्रामपंचायतचे सरपंच नितीन डुंबरे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे  चैतन्यपूर तालुका अकोले येथे दिनांक २२/१२/२०२२  गुरुवार रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे

 याबाबत त्यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार डॉक्टर किरण लहामटे ,तहसीलदार अकोले, पोलीस निरीक्षक अकोले, तसेच वीज  वितरण चे अधिकारी यांना निवेदन पाठवले आहे 

सरपंच नितीन डुंबरे यांनी निवेदनात  म्हटले आहे की महावितरणचे राजुर (अकोले, अहमदनगर) येथील सहायक अधिकारी विवेक मेवाड व ब्राम्हणवाडा (अकोले, अहमदनगर) येथील श्री घोलप यांनी केलेल्या शेतकरी बांधव व सरपंच यांचा अपमान तसेच केलेला भ्रष्टाचार यांची चौकशी व्हावी, तसेच त्यांना तत्काळ निलंबित करावे..

    महावितरणच्या मनमानी कारभारास जनता कंटाळ ली असुन . त्यांची मुजोरी आणि भ्रष्टाचार काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव मला माझ्या गावासाठी आणि परिसरासाठी आमरण उपोषणाला बसावे लागत आहे. मी दिनांक गुरुवार दि २२ / १२ / २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन बेमुदत अमर उपोषणाला खालील मागण्या  घेऊन बसणार आहे.

समस्त शेतकरी व सरपंच यांना चोर म्हणुन केलेली अवहेलना, समस्त शेतकरी व जनसेवक असलेले समस्त सरपंच यांच्या भावना दुखवल्या आहेत. राजुर येथील मेवाड व ब्राम्हणवाडा येथील अधिकारी श्री घोलप हे संगममत करून लोकांकडून पैसे उकळतात अशी तक्रार आहे. राजूर व ब्राम्हणवाडा येथील दोन्ही अधिकारी यांची विभागीय व आर्थिक गुन्हे शाखे कडून चौकशी व्हावी . माझ्या ग्रामपंचायत वर केलेली कारवाई ही आकासापोटी आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला महावितरणने घरी पाठवावे, लोकांना नवीन कोटेशन घेताना घेतलेल्या रकमेची पावती न देणे तसेच अधिक पैसे घेणे अशी खूप प्रकरणे आहेत याची आर्थिक गन्हे शाखेने चौकशी करावी.

मेवाड व घोलप यांच्या काळातील सगळ्या कामाची विभागीय चौकशी व्हावी. दारू पिऊन कामावर येणारे अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी.विद्युत रोहित्र वेळेत न पोहोचवल्या बद्दल ठेकेदार, वायरमन तसेच संबंधित सर्व अधिकारी यांची चौकशी व्हावी व कारवाई व्हावी.

चैतन्यपुर गावाला तत्काळ पूर्ण वेळ।निर्व्यसनी वायरमन मिळावा आज पर्यंत किती वेळा उशिरा रोहित्र बसवले. त्यामुळे झालेले नुकसान तसेच चुकीची झालेली महावितरणची वसुली ही परत शेतकरी बांधव व घरगुती ग्राहकांना मिळावी.

अनेक शेतकरी बांधवाना २.५ hp चे मोटारीचे जास्तीचे बिल पाठवले आहे. तत्काळ अधिकची  वसुली बंद करून शेतकऱ्यांना अधिक भरलेले पैसे परत मिळावे व त्यांना परत त्याच्या कोटेशन प्रमाणे बिल मिळावे.अशा विविध मागण्यांसाठी  चैतन्यपूर चे सरपंच नितीन डुंबरे उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे

———-–

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button