अगस्ति विद्यालयाचे ५७ वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ

अकोले प्रतिनिधी
– श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटी संचलित अगस्ति माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे ५७ वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ तसेच थोर स्वातंत्र्यसेनानी गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी सर यांच्या १३ व्या स्मृतिदिना निमित्त व्याख्यान आयोजित् केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य अशी ओळख असलेल्या अगस्ति विद्यालयात गुणवत्तेबरोबर विविध प्रकारचे सहशालेय उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातून पालकांची मने जिंकणाऱ्या विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
सोमवार दिनांक २६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता विविध गुणदर्शन कार्यक्रम अकोले तालुक्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, उद्योजक प्रविण देशमुख यांचे शुभहस्ते होणार आहे. मंगळवार २७ डिसेंबर रोजी अकोले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत , शिक्षणविस्ताराधिकारी जालिंदर खताळ, नगरसेवक शरद नवले यांचे शुभहस्ते पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दिनांक २८ डिसेंबर रोजी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचे शुभहस्ते व चित्रपट निर्माते एम के धुमाळ , उद्योजक नितीन गोडसे, संस्थेच्या अध्यक्षा शैलजा पोखरकर , नगराध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे .
गुरुवार दिनांक २९ डिसेंबर रोजी सकाळी श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक थोर स्वातंत्र्यसेननि गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी सर यांचे स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत, सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे जाहीर व्याख्यान संस्थेच्या सेक्रेटरी दुर्गाबाई नाईकवाडी यांचे अध्यक्षतेखाली व अकोले तालुक्याचे सुपुत्र व लिज्जत पापड उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक सुरेश कोते यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे .
विद्यालयाच्या सर्वच कार्यक्रमास मोठया संख्येने पालकांनी व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतिष नाईकवाडी विद्यालयाचे प्राचार्य शिवाजी धुमाळ यांनी केले आहे .