खरवंडी कासार येथील महेश सुपेकर महाराष्ट्र बँकेत परिविक्षाधीन अधिकारी

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील महेश सुपेकर यांची आयबीपीएस आर आर बी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमधून महाराष्ट्र ग्रामीण बँक मध्ये Probationary officer scale 1( परिविक्षाधीन अधिकारी) पदी निवड झाल्याबद्दल खरवंडी कासार ग्रामस्थांच्यावतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला

तसेच महेश सुपेकर यांचे विषयी सांगायचे म्हणजे अतिशय गरीब कुटुंबातील हा असून आणि तो शरीराने दिव्यांग असून तरी त्याने ही जिद्द मनामध्ये ठेवून रात्रंदिवस अभ्यास करून ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचे कार्य केले आहे त्याचे संपूर्ण शिक्षण खरवंडी कासार येथील मामांच्या शिवाजी देशमुख व दिलीप देशमुख यांच्याकडे झाले खूप कष्ट सोसत जिवाचे रान केले आणि त्या मेहनतीला आज फळ मिळाले असे यावेळी महेश यांनी सांगितले
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष माणिक खेडकर, भाजपा अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रशीद तांबोळी, खरवंडी कासार चे सरपंच प्रदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य योगेश अंदुरे, बाळासाहेब जगताप, दौलत सोनवणे, रावसाहेब पवळे, दौलत सोनवणे, युसफभाई बागवान, माजी सरपंच बाळासाहेब बटुळे, जय भगवान महासंघाचे लहू दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबादास राऊत, मा. सरपंच विजय राठोड, विक्रम सुलक्षणे, पंढरीनाथ केकान, एव्हाण गायकवाड, संदीप देशमुख, बापू यमगर, सुरेश केळगंद्रे, आयुब पठाण, दयावान सोनवणे, शिराज तांबोळी, अलिस बागवान, व परिसरातील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते व सर्व भगवानगड खरवंडी कासार परिसरातून महेश शुभेच्छा चा वर्षाव केला जात आहे