पेटिट हायस्कूलमधील ४४ वर्षांपूर्वीच्या वर्गमित्रांचा रविवारी स्नेहमिलन समारंभ
संगमनेर / प्रतिनिधी
संगमनेरच्या पेटिट विद्यालयातील १९७८ च्या बॅचचे माजी विद्यार्थी व प्रतिथयश उद्योजक, व्यावसायिक. डाॅक्टर, सी.ए. , वकील, शिक्षक,पत्रकार, व्यंगचित्रकार, प्रगतिशील शेतकरी, अधिकारी येत्या रविवारी दि. २५ रोजी ४४ वर्षांनंतर एकत्र येणार असून या बालमित्रांची मैफल मालपाणी बँक्वेट हाॅलमध्ये रंगणार आहे. पेटिट हायस्कूलमध्ये १९७८ साली दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचे करियरचे मार्ग वेगवेगळे झाले. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाला आहे. त्यानंतर तब्बल ४४ वर्षांनंतर हे माजी विद्यार्थी एकत्र येत आहेत. या सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. संपूर्ण दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा अत्यंत अनोखा असा समारंभ होणार असून या स्नेहमिलनाच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीचे दीपक मणियार, पांडुरंग पगडाल, रवींद्र एरंडे, डाॅ.मुकुंद गाडगीळ,राजा लाहोटी,सुनील दिवेकर,अरविंद गाडेकर व सर्व वर्गमित्र प्रयत्नशिल आहेत.