तिखोल येथे खासदार विखेंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डबेवाटप

खा. विखेंच्या माध्यमातून विकासकामें प्रगतीपथावर : मा. सभापती अरुणराव ठाणगे
दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
तालुक्यात खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे वाटण्यात येत आहेत तालुक्यात प्रत्येक गावात जाऊन हे डबे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत. तिखोल येथील शाळेत पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरुणराव ठाणगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना डबे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी सभापती ठाणगे म्हणाले
तिखोल फाटा ते करंडी आठ कोटीचे काम खासदार डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. तसेच तिखोल ते साईनाथ मळा रस्ता मजबुतीकरणासाठी खासदार निधीतून पाच लाख रुपये अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांच्या प्रयत्नाने दोन्ही रस्त्यांना मंजुरी मिळाली असून सदरचे काम लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे तिखोल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.. नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार डॉ. सुजय विखे व पारनेर तालुक्याचे नेते सुजितराव झावरे पाटील यांच्या माध्यमातून तिखोल व परिसरामध्ये आज अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहे. विद्यार्थ्यांच्या साठी जेवणाचे डबे वाटप करून डॉ. सुजय विखे सामाजिक ही जोपासण्याचे काम करत आहेत.
खासदार सुजय दादा विखे पाटील यांचे वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिखोल, काळुनगर व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे वाटप करण्यात आले यावेळी अरुणराव ठाणगे यांच्या समवेत संचालक ठकाजी ठाणगे गुरुजी, मा.सरपंच सुभाष ठाणगे, मा.चेअरमन नागचंद ठाणगे, प्रगतीशील शेतकरी सुभाष ठाणगे, सखाराम मंचरे, राघु ठाणगे, शिवाजी ठाणगे गुरुजी, बाळु ठाणगे, शेळके सर, सोनवणे सर, मुख्याध्यापक कोरडे सर व त्यांचे सहकारी शिक्षक, काळुनगरचे भामरे सर,अंगनवाडी सेविका व विद्यार्थी मित्र यावेळी उपस्थित होते.