आजचे पंचांग व राशिभविष्य दि.३१/१२/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष १० शके १९४४
दिनांक :- ३१/१२/२०२२,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०२,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- पौष
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- नवमी समाप्ति १८:३४,
नक्षत्र :- रेवती समाप्ति ११:४७,
योग :- परिघ समाप्ति ०८:१९,
करण :- तैतिल समाप्ति ३०:४८,
चंद्र राशि :- मीन,(११:४७नं. मेष),
रविराशि – नक्षत्र :- धनु – पू.षा.,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:४७ ते ११:१० पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:२५ ते ०९:४७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:५५ ते ०३:१७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:१७ ते ०४:४० पर्यंत,
❀ दिन विशेष:-
दग्ध १८:३४ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष १० शके १९४४
दिनांक = ३१/१२/२०२२
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवा. सर्दी, खोकला व ताप यामुळे प्रकृती बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. परोपकारात धनाची लूट होण्याची परिस्थिती निर्माण होईल. सबब सांभाळून राहा. मानसिक बेचैनी राहील. मांगलिक व सामाजिक कार्यावर पैसा खर्च करावा लागेल.
वृषभ
आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबात सुख व शांती राहील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदात वेळ घालवाल. उत्पन्नात व व्यापार – व्यवसायात वाढ होईल. रम्य स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत आखाल. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. त्यांच्याकडून आदर मिळेल. व्यापारात ओळख व संपर्क यांमुळे लाभ होईल. संतती व पत्नी यांच्याकडून चांगल्या बातम्या मिळतील. दांपत्यसुख उत्तम मिळेल.
मिथुन
आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. मित्रांच्या भेटीतून आनंद मिळेल व फायदा सुद्धा होईल. संतती कडून लाभ होऊ शकतो. उत्तम भोजन मिळेल. संतती कडून एखादी चांगली बातमी मिळेल. नोकरी – व्यवसायात प्राप्ती वाढेल.
कर्क
आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज मांगलिक कार्यात आपला सहभाग असेल. मांगलिक कार्यात सहभागी झाल्याने आनंदित व्हाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. आरोग्य उत्तम राहील. मन पण चिंतामुक्त होईल. अचानक धनलाभ संभवतो. नशिबाची साथ लाभेल.
सिंह
आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. धार्मिक किंवा मंगल कार्यात आपणास सहभागी व्हावे लागेल. प्रवास संभवतात. आज आपला संताप वाढल्याने आपले मन अशांत होईल. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आज व्यवसायात अडथळा येईल. परदेशातील आप्तांकडून खुषालीची बातमी मिळेल.
कन्या
आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे – पिणे टाळावे लागेल. आज आपला स्वभाव चिडचिडा झाल्याने बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खूप खर्च होईल. पाण्या पासून जपून राहावे लागेल. सरकार विरोधी कृत्ये, भांडणे ह्यापासून शक्य तितके दूर राहावे.
तूळ
आर्थिक प्रगतीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मित्रांना समर्थन द्या सापडेल पराक्रम आणि प्रतिष्ठा वाढेल. पैसा मिळेल. अनपेक्षित खर्च समोर येतील. कर्ज घ्यावे लागू शकते. जुन्या आजार उद्भवू शकतात. चिंता आणि तणाव राहील. अपेक्षित कार्ये विलंब होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणतेही अपरिचित व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
वृश्चिक
आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आरोग्य विषयक थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. शेअर – सट्टा यात न पडणे हिताचे राहील. शक्यतो प्रवासात जपून राहा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आर्थिक नियोजन यशस्वीरीत्या पूर्ण कराल.
धनु
आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज शरीर व मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आईशी मतभेद होईल किंवा तिच्या प्रकृती संबंधी चिंता राहील. सार्वजनिक दृष्टया आपला मानभंग होऊ नये याकडे लक्ष द्या. वेळेवर जेवण व झोप न मिळाल्यामुळे स्वभाव चिडचिडा होईल. महत्वाची खरेदीपत्रे करू नका.
मकर
आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल. कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल. व्यापार – व्यवसायात आर्थिक लाभ होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नवीन काम हाती घेण्यास दिवस अनुकूल आहे.
कुंभ
आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल. वाद – विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा. कामात अल्प यश मिळेल. समाधानाची भावना अनुभवाल. पण आरोग्य बिघडेल. विद्यार्थ्यांना विद्या प्राप्तीत अडचणी येतील. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे.
मीन
आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपणास खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. संताप व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज कोणाशीही मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आज आर्थिक देवाण – घेवाण सावधपणे करावी लागेल. आप्त स्वकीयांशी वाद होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारणच राहील. मनात नकारात्मक विचार येतील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर