अकोले तालुक्यातील हा आदिवासी तरुण आपल्या ध्येयांना आकार देतोय ……

अकोला/प्रतिनिधी –
अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या गेलेल्या खिरविरे येथील आंबेविहीरीचा तरूण विकास लक्ष्मण डगळे आपल्या धे याला आकार देत वाटचाल करत आहे

कृषी पदविका अभ्यासक्रम पुर्ण करत आपले ध्येय पूर्ततीसाठी धडपडत वाटचाल करत आहे.
विकास डगळे याने इयत्ता १ली ते ४थी पर्यंतचे शिक्षण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुर्ण केले. इ.५वी ते १२पर्यंतचे शिक्षण सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरे येथे झाले. १oवी नंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. वडील लक्ष्मण डगळे व आई सकुबाई शेती करूनच कुटूंबाची गुजरान करतात.वडील कळसुबाई बियाणे सामाजिक संस्थेत अध्यक्ष पदावर कार्य करत असून आंबेविहीर या छोट्याशा वाडीत बियाणे संवर्धन केंद्र चालवतात. हाच वसा पुढे चालवत कुटूंबाची आर्थिक घडी सुव्यवस्थित होण्यासाठी ग्रामीण तरूणांपुढे एक आदर्श ठेवत विकास डगळे या तरूणाने कृषी शिक्षणातुन समृद्धीकडे हा मुलमंत्र जपत डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ मान्यताप्राप्त पारसिक लोकमित्र मंडळ संचलित कृषी तंत्र विदयालय खानिवली,ता. भिवंडी, जि. ठाणे येथे कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम पुर्ण करण्याचे ध्येय ठेवले.
सरकारी नोकरीची अशा न बाळगता स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतः व्यावसाय उभा करायचा त्यातुनच कुटूंबाची आर्थिक घडी बसवायची हे ध्येय उराशी बाळगुन आज मशरूम शेती, बियाणे रोप संवर्धन,कुकुटपालन,शेळीपालन,दुग्ध व्यावसाय यांसारखे शिक्षण कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमातुन पुर्ण करण्याचे स्वप्न आहे.या सर्व अभ्यासक्रमातुन आंबेविहीर येथे व्यावसाय लवकरच उभे करून आपले ध्येयपुर्ण करण्याचा मानस विकास डगळे याने व्यक्त केला.

जेवढी मोठे स्वप्न तेवढ्या अडचणी मोठया
जेवढी मोठी स्वप्न असतात,तेवढीच मोठ्या अडचणी पण येतात,आणि जेवढ्या मोठया अडचणी येतात,यश सुद्धा तेवढेच मोठे मिळते या प्रमाणे अनेक अडचणींवर मात करून आई, वडीलांचे स्वप्न सत्यात उतरविण्याचा मानस आहे. नोकरीची अशा न ठेवता तरूणांपुढे एक आदर्श निर्माण करून शेती व्यावसायाला जोडधंदा म्हणून कृषी तंत्र अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे.
_विकास डगळे.