पत्रकार दिनी उरण येथे पत्रकारांचा सन्मान!

उरण /रायगड जिल्हा
हेमंत सुरेश देशमुख
पत्रकार दिनाचे औचित्य साधून उरण मधील सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या माध्यमातून उरण नगर परिषदेचे माँ साहेब मीनाताई ठाकरे सार्वजनिक वाचनालय उरण शहर येथे पत्रकारांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार जगदिश तांडेल यांनी पूर्वीची पत्रकारिता व आजची पत्रकारिता या विषयावर आपले मनोगत व्यक्त करत पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कशी गदा येते. पत्रकारांना काम करताना कोणकोणत्या अडचणी येतात याविषयी जगदिश तांडेल यांनी आपले मनोगत व्यक्त करून आजच्या पत्रकारितेबद्दल चिंता व्यक्त केली.पत्रकारांना अल्प मानधन देऊन त्यांना राबवून घेतले जातात. पत्रकारांना अनेक समस्या आहेत मात्र त्या समस्याकडे शासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे.पत्रकारांच्या अनेक संघटना आहेत त्यांनीही पत्रकारांच्या समस्या सोडविण्याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत व्यक्त केले

यावेळी उरण नगर परिषदेचे माँसाहेब मिनाताई ठाकरे सार्वजनिक ग्रंथालयाचे ग्रंथपाल संतोष पवार, ग्रंथालय सहाय्यक जयेश वत्सराज, ज्येष्ठ पत्रकार जगदिश तांडेल , दिलीप कडू, उरण तालूका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू , विरेश मोडखरकर, हेमंत देशमुख, श्रीधर पाटील , विठ्ठल ममताबादे आदि पत्रकार, उपस्थित होते.यावेळी वीरेश मोडखरकर, श्रीधर पाटील,संतोष पवार यांनीही मनोगत व्यक्त करून सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.