‘सुवर्ण बिंदू’ लहान मुलांसाठी ‘अमृत समान’ – डॉ. वैष्णवी साका

सोलापूर : पुरातन काळापासून लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सोळा संस्कार आवर्जून करायचे. त्यामध्ये सुवर्ण बिंदू प्राशन हेही असून ते लहान मुलांसाठी अमृत समान मानले जाते. लहान मुलांना सुवर्ण बिंदू पाजल्याने प्रतिकारशक्तीत आणि बुद्धीमध्ये वाढ होण्यास मदत होते, असे प्रतिपादन डॉ. वैष्णवी साका यांनी केल्या.
पद्मशाली समाजाचे कुलदैवत चिरंजीव महर्षी मार्कंडेय महामुनी जन्मोत्सवाचे औचित्य साधून सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित, पद्मशाली सखी संघम आणि भैरी क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसाठी सुवर्ण बिंदू प्राशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महेशकुमार भैरी, अध्यक्षा माधवी अंदे, सचिवा ममता मुदगुंडी, खजिनदार प्रभावती मद्दा यांची उपस्थिती होती. त्या पुढे म्हणाल्या, महिन्यातून फक्त ‘पुष्प नक्षत्र’ रोजीच सुवर्ण बिंदू लहान मुलांना पाजले जाते. कारण, पुष्प नक्षत्राचा प्रभाव पडतो. लहान मुलांना भुक वाढून प्रतिकारशक्ती वाढते, बुद्धीमानही होतात.
याप्रसंगी किशोर व्यंकटगिरी यांचे सहकार्य मिळाले. सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक सचिवा ममता मुदगुंडी यांनी केल्या. तर, खजिनदार प्रभावती मद्दा यांनी आभार मानल्या. लहान मुलांना सुवर्ण बिंदू प्राशन करण्यासाठी पालकांची अलोट गर्दी लोटले होते. जवळपास १०० पेक्षा जास्त मुलांच्या पालकांनी सवलती दराचा लाभ घेतला.
: