अवैध दारु विक्रेत्यांवर .कठोर कारवाई करणार ..तर मला थेट फोन करा ,राजुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश इंगळे

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
अकोले तालुक्यातीलराजूर गावात दारूबंदी असतानाही काही लोक चोरट्या मार्गाने देशी-विदेशी दारूची विक्री करत असल्याचे दिसून येत आहे या अवैध दारूचे उच्चाटन करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे यासाठी नागरिकांनी राजुर पोलीस स्टेशनला सहकार्य करावे असे आवाहन राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी केले आहे
आपला मोबाईल नंबर सार्वजनिक करत आपल्या मोबाईल वर नागरिकांनी थेट। +91 88051 48478 सम्पर्क करवा असे आवाहन शती श्री इंगळे यांनी यांनी केले आहे
आपल्या आसपास चोरट्या मार्गाने अशा प्रकारचा व्यवसाय कोणी करत असेल तर तात्काळ राजूर पोलीस स्टेशनची संपर्क करावा माझ्या या नंबर वर संपर्क करून याबाबतची माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल नागरिकांनी अवैध देशी विदेशी दारू विक्री रोखण्यासाठी सहकार्य करावे याबाबत माहिती दिल्यास वेळीच या व्यवसायिकांच्या मुसक्या आवळता येईल माझा मोबाईल क्रमांक 88051 48478 हा सर्वांसाठी खुला असून कोणत्याही नागरिकांनी याबाबत नी संकोचपणे निर्भीडपणे पुढे येऊन याबाबत तक्रार नोंदवावी असे
आवाहन राजुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी केले आहे
अवैध दारू बंदी चळवळ आणि राजूर येथील अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला. आहे राजूर पोलिस स्टेशनला निवेदन देऊन अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला. अकोले तालुका दारुबंदी चळवळीचे हेरंब कुलकर्णी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिले आहे. मात्र, तरी देखील पोलिस प्रशासनाकडून गावातील अवैध दारु धंदे बंद करण्यासाठी सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे यानुसार १५ जानेवारीला एक दिव साचे लाक्षणिक उपोषणाचा या इशारा दिला आहे . आठवड्यापर्यंत संबंधित अवैध धंदे बंद न झाल्यास अकोले तालुका दारुबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा पोलिस प्रशासनाला देण्यात आला आहे. असून याची दखल घेत राजूर पोलिसांनी अवैध दारूविक्री बाबत मोहीम अधिक तीव्र केली आहे