डाॕ.डी.वाय.पाटील महाविद्यालयात ‘भूगोल दिन’ साजरा.

आकुर्डी ः डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,आकुर्डी भूगोल विभागाच्यावतीने १४ जानेवारी रोजी व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते भूगोल विभागप्रमुख प्रा. गणेश फुंदे हे होते. त्या उपस्थितांना मार्गदर्शन करताना भूगोल दिन साजरा करण्यामागचा हेतू आणि उद्देश सांगितला. भूगोल या विषयाचे महत्व विशद करण्याबरोबरच त्या विषयातील नोकरीच्या संधी यांचा उहापोहा त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. मोहन वामन सर यांनी जैव-विविधतेचे महत्व सांगितले. त्याचबरोबर वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन काळाची गरज कशी आहे याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालान प्रा. भागवत देशमुख तर आभार प्रा. शितल दुंडगे यांनी मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. पी. डी. पाटील , उपाध्यक्षा डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव मा. डॉ. सोमनाथ दादा पाटील, विश्वस्त डाॕ. स्मिता जाधव मॕडम आणि प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये भूगोल विभागाच्या प्रा. शितल दुंडगे, डाॕ. मुकेश तिवारी, डाॕ. विजय गाडे यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी सहभाग नोंदविला.