बदनामीच्या भीतीने त्याने गळफास घेऊन संपविली जीवन यात्रा!

त्याने उसने पैसे परत मागितले तर दिली छेड छाडीचा खोटा गुन्हा दाखल करण्याचे धमकी,
दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
छेड छाडीचा खोटा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिल्याने बदनामीच्या भीतीने तरुणाने गळफास घेऊन स्वतःची जीवन यात्रा सम्पविलीं
नेवासा तालुक्यातील माका येथे ही घटना घडली
सारगंधर श्रीधर लोंढे (वय २७, रा. लोंढे वस्ती, वाघोली रोड, माका) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे
मयत तरुणाने आरोपीना चार लाख 13 हजार रुपये उसने दिले होते ते परत मागितले याचा राग आल्याने मयत तरुणाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली होती
याबाबत सोनई पोलीस ठाण्यात तिघां विरोधात आत्महत्या करणेस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
. पोलिसांकडून याबाबत समजलेली माहिती अशी की, सारगंधर श्रीधर लोंढे (वय २७, रा. लोंढ वस्ती, वाघोली रोड, माका) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मृत सारंगधर यांचे वडील श्रीधर लोंढे यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अलका भाऊसाहेब लोंढे, अमोल भाऊसाहेब लोंढे, नीलेश भाऊसाहेब लोंढे (सर्व रा. माका) यांच्याविरोधात गुन्हा गुन्हा दाखल केला.
मयत सारंगधर याने लोकांकडून ४ लाख १३ हजार रुपये उसने आणून आरोपींना दिले होते. या पैशाची मागणी केल्याने आरोपीने तुझ्यावर छेडछाडीचा खोटा गुन्हादाखल करू अशी धमकी दिली. या त्रासाला कंटाळून सारंगधरने दि. १८ रोजी शेतातील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.