पिंपळगाव रोठा येथे महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पिंपळगाव रोठा ,तालुका पारनेर येथील गावठाण मधील पुरातन देवस्थान श्री त्रंबकेश्वर महादेव देवस्थानात महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्याचे प्रथम किरण महादेवाच्या पिंडीवर पडतात तसेच, सन २००४ साली स्वामी गगनगिरी महाराज यांच्या शुभहस्ते या मंदिराचे कलशारोहन संपन्न झाले आहे.
महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने दि. १८ फेब्रुवारी ला शनिवार रोजी स. ७ वा. श्री अभिषेक ,पूजा व महाआरती, स.१० वा. . डॉ. गजानन महाराज काळे (कुलस्वामी खंडेराय कथेचे पहिले कथाकार) यांचे सुश्राव्य किर्तन होईल. दुपारी १२ वा. साबुदाणा फराळ महाप्रसाद भाविक भक्तांना पंगतीतून वाटप केला जाईल.
सन २००४ सालापासून श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानचे माजी अध्यक्ष ऍड पांडुरंग गायकवाड यांच्या मातोश्री कै. उल्हासाबाई विठ्ठल गायकवाड यांच्या स्मरणार्थ कीर्तन सेवा बिदागी दिली जाते.व फराळ महाप्रसादात गावातील भाविक भक्त शाबुदाणा, शेंगदाणे, तेल ,मिरची, केळी अशा प्रकारच्या वस्तू दान रुपात अर्पण करून सेवा घडवतात.
पिंपळगाव रोठा पंचक्रोशीतील भाविक भक्तांना नम्र आवाहन आहे की, जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कीर्तन व फराळ महाप्रसाद सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे.
या महाशिवरात्री महोत्सवानंतर दुपारी २.०० वा.जय मल्हार विद्यालयाचा रौप्य महोत्सव याच ठिकाणी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन जय मल्हार विद्यालय, जय गगनगिरी सेवा मंडळ ,भजनी मंडळ, तरुण मंडळ,ग्रामस्थ,मुंबईकर यांनी केले आहे.