साकळाई योजना मार्गी लावू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

श्रीगोंदा प्रतिनिधि:
लोणी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी साकळाई योजना कृती समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आमदार श्री.बबनरावजी पाचपुते,खा.डाॅ.सुजय विखे पाटील,माजी आमदार शिवाजीराव कर्डीले,साकळाई योजना कृती समितीचे अध्यक्ष ह.भ.प. बाबा महाराज झेंडे, नारायणराव रोडे,सरपंच सुरेश काटे,सोमनाथ धाडगे,डाॅ.योगेंद्र खाकाळ,उद्योजक ज्ञानदेव भोसले,पत्रकार जितेंद्र निकम,माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख झेंडे, भा.ज.पा. सरचिटणीस ऋषिराज चौधरी,युवा नेते मंजाबापू झेंडे, जलसंपदाचे अधिकारी वाळके साहेब व कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी त्यांनी साकळाईचे भुमिपुजन लवकरच करणार असून सर्व्हेसाठी निधी तातडीने टाकत असून येत्या आठ-दहा दिवसात याचा तातडीने निर्णय घेत आहे असे पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले.
