अमरापूर येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी

रोटरी इंटरनॅशनल क्लबच्या ११८ वर्धापन वर्धापन उत्साहात
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती व रोटरी इंटरनॅशनलचा ११८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून अमरापूर येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले.
शिबिरामध्ये ३८ नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. १८ नेत्र रुग्णांची ऑपरेशनसाठी निवड करण्यात आली असून लवकरच बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे सेवानिवृत्त उपप्राचार्य किसनराव माने होते. यापूर्वी अमरापूर येथे अंधमुक्त व्हिलेज या संकल्पनेतून चारशेपेक्षा जास्त नेत्र रुग्णांची मोफत तपासणी झालेली असून ७० रुग्णांची मोफ़त नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती रोटरीचे अंधमुक्त व्हिलेज संकल्पनेचे प्रोजेक्ट चेअरमन बाळासाहेब चौधरी यांनी प्रास्ताविक भाषणात दिली.
शिबिरासाठी बुधराणी हॉस्पिटल पुणे येथील डॉ विशाल भिंगारदिवे,अमरापूर आरोग्य उपकेंद्राच्या डॉ वर्षा साळवे, माजी सरपंच नामदेवराव पोटफोडे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर शेवंगावचे विस्वस्त दत्तात्रय काळे, मुख्याध्यापक राजेंद्र पाचे, आसाराम उकिर्डे, रंजना खरात, संगीता भुजबळ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब चौधरी यांनी केले. तर आभार संध्या पोटफोडे यांनी मानले.