गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला भीषण आग

अहमदनगर प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील नजिक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाला आज शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली आहे .ही आग इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्या फुटल्याने लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
आगीने रौद्ररुप घेतले असून इथेनॉल असल्यामुळे आगीची तीव्रता अधिक आहे. यामुळे कारखाना परिसरातून नागरिकांना दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. कारखाना प्रशासन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. आगीपासून बचाव होण्यासाठी परिसरातील नागरिक, कामगार, कर्मचारी यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
नजीक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प आहे. या प्रकल्पातील इथेनॉलच्या टाक्या फुटून आग लागली. इथेनॉलमुळे आग मोठ्या प्रमाणात भडकत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कारखान्यातील कामगार, कर्मचारी यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत.