कुसुमाग्रजांचे साहित्य आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणिव करुन देणारे..!
श्री. आदिनाथ सुतार
अकोले प्रतिनिधी
आज सोमवार दि.27/2/2023 रोजी इंग्रजी माध्यम माध्यमिक आश्रम शाळा राजूर कॅम्प मवेशी शैक्षणिक संकुल येथे कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा स्मृतिदिनानिमित्त जागतिक मराठी राजभाषादिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सुरेश बोटे हे होते. कुसुमाग्रज
प्रतिमापुजन ,मान्यवरांंचा सत्कारानंतर शाळेतील मुलांनी राजभाषा दिनानिमीत्त तयार करण्यात आलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमात
शाळेचे मुख्याध्यापक श्री.आदिनाथ सुतार यांनी मराठी साहित्यीकांविषयी बोलतांना आपल्या प्रमुख भाषणात सांंगितले की, ‘मराठी साहित्यातील दैदीप्यमान रत्न’ अशी ख्याती असणारे कवी, नाटककार, कथाकार व समीक्षक म्हणजे वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावणारे विपुल लेखन त्यांनी केले. आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे आणि त्यांचे साहित्य म्हणजे मराठी वाड्:मयातील उच्चतम कोटीचे वैभव आहे. मराठी साहित्याला दुसरे ज्ञानपीठ त्यांनी मिळवून दिले. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. संघर्षात जगण्यासाठी बळ देणाऱ्या मान्यवरांचे स्मरण करण्याची संधी देणारा हा फेब्रुवारी महिना. परकीय अंमलास झुगारून स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, संगीत शिरोमणी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, समाजसुधारकांचे अग्रणी महात्मा ज्योतिबा फुले, स्वच्छतेचे पुजारी संत गाडगेबाबा आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे जन्मदिवस या महिन्यात येतात. याच महिन्यात स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी चंद्रशेखर आजाद, मौलाना अब्दुल कलाम आझाद, स्वातंत्रवीर वि.दा. सावरकर, डॉ. राजेंद्र प्रसाद ही थोर व्यक्तिमत्वे काळाच्या पटलावर आपला ठसा उमटवून अंतिम प्रवासासाठी गेली. त्यांच्या स्मृती आपण सर्वांना स्फूर्तीदायी ठरणार आहेत. महाराष्ट्राचे भूषण ठरलेल्या कविवर्य कुसुमाग्रजांचा यांचा २७ फेब्रुवारी रोजी येणारा जन्मदिवस हा जागतिक मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगुन विषाखा कविता संग्रहातील कोलंबसचे गर्वगित,मातीचे गायन,काही बोलायचे आहे. इत्यादी कवितांसह बहिणाबाईंची गाणी, ना.ध.महाणोरांच्या निसर्ग कवितातील प्रतिमा तुकाराम धांडे यांच्या रानातल्या कविता सादर केल्या.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे,कविता वाचन,व गायन तसेच कुसुमाग्रजांसह इतर कवी साहित्यिकांचा जीवन परीचय व साहित्याचा आढावा घेतला कार्यक्रमात
श्री.सुरेश पवार, श्रीम. मेघना खेडकर, संदिप रिसे, पुष्पा लोहकरे,सोनाली गंभिरे, शारदा दारकुंडे ,प्रतिक्षा बगड,सुलोचना धोंगे
यांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना उदबोधित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.सुरेश बोटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की सामान्य मानसांचं जगणं, सुखदुःख शब्दबद्ध करणे म्हणजेच साहित्य होय हे अनुभव संमृद्ध लेखन मानसाच्या जगण्यास बळ देते असेही श्री. बोटे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गणेश कोकाटे यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी समाधान करटुले यांनी ऊपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमात मुलांचा सहभाग ऊस्फुर्त होता पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.