इतर
श्रामिनी चौधरी यांची नांदूरपठारच्या सरपंचपदी बिनविरोध निवड

उपसरपंचपदासाठी हरीभाऊ देशमाने यांचे नाव निश्चित
आ. नीलेश लंके यांनी केले अभिनंदन
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
नांदूरपठारच्या सरपंचपदी सौ. श्रामिनी संदीप चौधरी यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. चौधरी या आ. नीलेश लंके यांचे स्विय सहाय्यक संदीप चौधरी यांच्या सुविद्य पत्नी आहेत.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या नांदूरपठार ग्रामपंचायतीच्या निवडणूूकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित पॅनलने सर्व ९ जागा जिंकत ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षीत असलेल्या सरपंचपदावर दोन वर्षापूर्वी चित्रा दिनेश घोलप यांची तर उपसरपंचपदी सुरेश लक्ष्मण आग्रे यांची एकमताने निवड करण्यात आली होती. दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने सरपंच चित्रा घोलप तसेच उपसरपंच सुरेश आग्रे यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले होते.
रिक्त सरपंचपदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी पंकज जगदाळे यांनी बुधवारी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलविली होती. या सभेमध्ये सरपंचपदासाठी श्रामिनी संदीप चौधरी यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर कोमल शशिकांत आग्रे यांनी सुचक म्हणून तर गोरख भागा पानसरे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत श्रामिनी चौधरी यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज जगदाळे यांनी जाहिर केले. जगदाळे यांना तलाठी येवले व ग्रामसेवक सांगळे यांनी सहाय्य केले.
यावेळी माजी सरपंच रविंद्र राजदेव, माजी उपसरपंच सुरेश आग्रे, सेवा संस्थेचे चेअरमन मदन देशमाने, माजी चेअरमन नारायण राजदेव, माजी सरपंच भानुदास आग्रे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्ता चौधरी, नारायण आग्रे, नवनाथ घोलप, जयराम चौधरी, शशिकांत आग्रे, ग्रामपंचायत सदस्य शिवप्रसाद दिवेकर, कोमल आग्रे, सोनाली आग्रे, बाळासाहेब लंके, गणपत पाटील घोलप, गोरख पानसरे, सुनील राजदेव, रामदास वलवे, गोपाळा आग्रे, देमन पाटील घोलप, राजधर राजदेव, हरिभाऊ राजदेव, बाळासाहेब शिरतर, मंगेश आहीले, दत्ता देशमाने, भास्कर चौधरी, कचर आग्रे, बाबाजी पानसरे, माधव आग्रे, रामदास राजदेव, अर्जुन चौधरी, संजय देशमाने आदी उपस्थित होते.
हरिभाऊ चौधरी उपसरपंच ?
सरपंच, उपसरपंचांनी राजीनामे दिल्यानंतर प्रशासनाने सरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहिर केला. सरपंचपदी श्रामिनी चौधरी यांची निवड झाल्यानंतर आता सरपंच चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या सभेमध्ये उपसरपंचपदाची निवड होणार आहे. त्यासाठी हरिभाऊ चौधरी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.