देशविदेश

कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात पर्यटनास बंदी !

भंडारदरा कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यस पर्यटनास बंदी

राजूर /प्रतिनिधी

भंडारदरा येथे आज कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा व क्षेत्रातील सर्व गावांचे सरपंच, समिती अध्यक्ष, टेन्ट धारक यांची covid-19 च्या प्रतिबंधात्मक उपयोजना बाबत शासन आदेशाची अंबलबजावणी करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती

सदर सभेत मा. जिल्हाधिकारी अहमदनगर ,वनसंरक्षक व वन्यजीव विभाग नाशिक यांच्या covid-19 चे प्रादुर्भाव वाढल्याने पर्यटनस्थळात बंदीबाबत आदेश प्राप्त झालेले आहेत सदर विषयावर सर्व गावातील सरपंच ,अध्यक्ष यांनी बंद ठेवण्याबाबत सहमती दर्शवली तसेच कोणताही पर्यटक अभयारण्य क्षेत्रात फिरताना दिसल्यास संबंधित गावची ग्राम वनव्यवस्थापन समिती दंडात्मक कारवाई करेल सदर विषय सर्व उपस्थितांनी मान्यता दिली …तरी कळसूबाई-हरिश्चंद्रगड गाभाऱ्यातील पर्यटन शासनाचे पुढील आदेश येई पर्यंत बंद करण्यात आले आहेत

पर्यटकांनी तपासणी नाक्यावर प्रवास यासाठी कोणताही दबाव आणू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल सदर सभा कशिकर साहेब वनरक्षक संरक्षक विभाग नाशिक गणेश रणदिवे सहाय्यक वनसंरक्षक कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली सदर सभेस वनपाल मुठे, वनपाल ,वनरक्षक ,पाटील ,सरपंच रतनवाडी, सरपंच कोलटेम्भे ,सरपंच घाटघर, सरपंच मुरशेत, सरपंच उडदावणे, टेन्ट धारक मोठे संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button