नेप्तीत श्रीराम संगीत कथेला प्रारंभ

अहमदनगर-.आधुनिक युगामध्ये राम कथेची खरी गरज आहे.राम कथामुळे एकता निर्माण होते. बंधुप्रेम शिकवणारी राम कथा आहे. मनुष्याला निर्माण होणारे अनेक प्रश्न रामकथेतून मार्गी लागतात. माणसाने प्रत्येकावर प्रेम करावे निंदाद्वेष करू नका परमार्थाचा देखावा करू नका.आजही समाजामध्ये रावण गेला आहे पण त्याच्या विचाराची अनेक लोक आहेत. खरच आपण रामा सारखे जीवन जगतो का. आजही काही लोकांच्या हदयात राम कथा ठासून भरलेली आहे असे प्रतिपादन रामाचार्य रामेश्व़र महाराज चव्हाण सुकळीकर यांनी केले.
नेप्ती(ता .नगर )येथे श्रीरामनवमी निमित्त श्रीराम सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने श्रीराम संगीत कथेचे आयोजन श्रीराम मंदिराच्या पटांगणात करण्यात आले आहे . दि. २४ ते दि.३१ मार्च पर्यत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीराम विजय ग्रंथ व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहे. सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात पताका लावण्यात आल्या आहेत. तसेच मंदिर परिसर स्वच्छ करून मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे . सोहळ्याचे हे ३४ वे वर्ष आहे. या सोहळ्या दरम्यान दररोज रात्री ८:३०ते ११ या वेळात कथा प्रवक्ते रामायणचार्य रामेश्व़र महाराज चव्हाण सुकळीकर कथेचे निरूपण करणार आहेत. त्यांना गायनाची साथ बळीराम महाराज गिरी, तबल्याची साथ जितेंद्र महाराज आळंदीकर देणार आहेत. महाप्रसादाचे नियोजन रावसाहेब भागिनाथ होळकर व ग्रामस्थांनी केले आहे . ३० मार्च रोजी रामेश्व़र महाराज चव्हाण यांचे सकाळी १०;३० ते १२;००या वेळेत राम जन्माचे कीर्तन होणार आहे. ३१ मार्च रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत संभाजी महाराज शिंदे बोधेगाव यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. काल्याचे कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान श्रीराम सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी श्रीराम सेवा मंडळाचे अध्यक्ष बबन फुले, उपाध्यक्ष बाळासाहेब होळकर,माजी सरपंच दिलीप होळकर, बाबासाहेब जाधव, रामदास फुले, बाळासाहेब बेल्हेकर,बबन बेल्हेकर, चंद्रकांत खरमाळे, एकनाथ होळकर, बबन शिंदे,जालिंदर शिंदे, रावसाहेब होळकर, तुषार भुजबळ ,विष्णू गुंजाळ, राजू फुले, भानुदास फुले, मारुती कावरे, शंकर इंगोले, सुवर्णा होळकर, सुभद्रा गुंजाळ व परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते