पूजाविधी मध्ये ‘योग्य कृती’ आणि ‘भावना’ महत्त्वाच्या – डॉ. कल्याणी.

.
सोलापूरात मोफत पौरहित्य प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन
सोलापूर : पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठले मंत्र म्हणायचे.? दररोजचे पूजाविधी कश्या पध्दतीने केले पाहिजे.? स्पष्टपणे उच्चार करणे, योग्य कृती (पध्दती) आणि भावना महत्वाचे असतात. आज प्रत्येक कुटुंबात जवळपास महिलाच पूजाविधी करत असतात, योग्यरित्या केल्याने मानसिक समाधान मिळतो. आजकाल अनेकजण गडबडीत पूजाविधी करतात, त्यामुळे विनाकारण ‘शंका’ निर्माण होतात. पूजाविधी करताना ‘मंत्रोच्चार’ करणेही महत्वाचे आहेत, असे मत पौरोहित्य प्रशिक्षिका डॉ. अपर्णा कल्याणी यांनी व्यक्त केल्या आहे.
चैत्र एकादशीचे औचित्य साधून सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली सप्तपदीच्या वतीने फक्त समस्त महिलांसाठी विनामूल्यपणे याचे आयोजन सिध्देश्वर पेठेतील पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या श्री मार्कंडेय मंदिरात केले होते. प्रारंभी चिरंजीव महर्षि मार्कंडेय महामुनींच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत, पौरोहित्य प्रशिक्षिका डॉ. अपर्णा कल्याणी, माजी महापौर जनार्दन कारमपूरी, ज्ञाती संस्थेचे विश्वस्त रामचंद जन्नू, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे सचिव गणेश पेनगोंडा, फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, सल्लागार सुकुमार सिध्दम, पुरोहित राघवेंद्र आरकाल, सुधीर सोमा, श्री मार्कंडेय जनजागृती संघटनेचे विश्वस्त श्रीनिवास रच्चा, कार्याध्यक्ष किशोर व्यंकटगिरी, हरिप्रसाद बंडी, संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले होते.