इतर
पारनेर तालुक्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा!

दत्ता ठुबे
पारनेर:-पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, खड़कवाडी, भाळवणी परिसरातील तसेच तालुक्यातील अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात वादळी गारपीट झाली .त्यामुळे अवकाळी गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.आधीच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, त्यात काढणीला आलेली सर्व पिके हातातून निघून जात आहे.यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.त्यामुळे तातडीने नुकसान झालेल्या परिसराचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश शिंदे यांनी महसूल विभागाकडे केली आहे.