भातकुडगाव फाट्यावर उद्या चक्काजाम आंदोलन

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टिमुळे वादळी वाऱ्यासह गारपिटीने कांदा, गहू, मका, ऊसासह फळबागेच्या झालेल्या नुकसानी सरसकट नुकसान भरपाईसह घराच्या व जनावराच्या गोठ्याच्या झालेल्या पडझडीची नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागणीसाठी बुधवार दिनांक १२/४/२०२३ रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिजभैय्या घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव – नेवासा राजमार्गावरील भातकुडगाव फाटा या चौफुल्यावर सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
यासंदर्भातील नियोजन बैठक भातकुडगाव फाटा येथील कामधेनु पतसंस्थेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीस अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष संजय कोळगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अनिलभाऊ मडके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सखाराम लव्हाळे, राजेंद्र आढाव, अशोकराव मेरड, बाळासाहेब काळे, राजेश फटांगरे, सचिन फटांगरे, ज्ञानदेव खरड, विठ्ठलराव फटांगरे, विठ्ठल प्रल्हाद आढाव,आण्णासाहेब शिंदे, बाबासाहेब माळवदे, विठ्ठल रमेश आढाव,माऊली निमसे, अशोक दुकळे, गणेश खंबरे, भाऊराव माळवदे, दादासाहेब माळवदे, संपत मगर, भाऊसाहेब मुके यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित होते
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. मात्र शासन व प्रशासनाने पंचनाम्याचा घाट न घालता सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या प्रमुख मागणीसाठी भातकुडगाव फाटा येथे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व डॉ. क्षितिज घुले यांच्या मार्गदर्शना खाली होत असलेल्या रस्ता रोको साठी शेतकऱ्यांनी बहुसंख्येने हजर राहावे असे आव्हान यानिमित्ताने करीत आहे.
राजेंद्र आढाव
युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी