पळवे खुर्द येथे गीताई महिला समूहाचा वर्धापन दिन साजरा

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
दिनांक १० सोमवार रोजी मठ वस्ती येथे गीताई महिला समूहाचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम नाशिक जिल्ह्याचे महसूल उपायुक्त गोरक्षनाथ गाडीलकर यांच्या सौभाग्यवती सौ. वंदनाताई गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. सी.आर.पी.सौ.मंगल ताई पळसकर या समूहास नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्यांनी आत्तापर्यंत पळवे खुर्द, मठ वस्ती, पळवे बुद्रुक, देशमुख मळा, जातेगाव, इत्यादी ठिकाणी नेहमी परिश्रम घेत वेळोवेळी महिलांना मार्गदर्शन करीत स्थापना केली. या ठिकाणी वंदनाताई म्हणाल्या नेहमी महिलांनी एकत्रित येणे गरजेचे आहे व व्यवहाराचे ज्ञानही असणे गरजेचे आहे. तसेच या समूहाची ऑनलाईन माहिती पाठवण्याचे कार्य सौ. प्रियांका तरटे या करत असतात. या ठिकाणी समूहाचे अध्यक्षा सौ.मनीषा गाडीलकर, सचिव सौ.नंदा दरेकर यांनी वर्षाकाठीचा ताळेबंद सादर केला. या ठिकाणी अशा प्रकारे केक कापून गीताई महिला समूहाने पहिला वर्धापन दिन साजरा केला. या ठिकाणी सौ. वंदनाताई गाडीलकर, सौ.मनीषा गाडीलकर, सौ.नंदा दरेकर, सौ. प्रियांका तरटे,सौ.अनिता गवळी, सौ. शितल गवळी, सौ.सुवर्णा गवळी,सौ. शांता साबळे, सौ. सीमा गवळी, सौ.सुजाता शेळके, सौ.लता पवार, सौ.मंगल गाडीलकर, सौ.उज्वला गाडीलकर आदी महिला उपस्थित होत्या. नाष्टा आणि चहापानाने या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.नंदा दरेकर यांनी केले सौ.मनीषा गाडीलकर यांनी आभार मानले.
