श्री संत खंडोजी बाबा पुण्यतिथी निमित्त खरवंडी कासार येथे हरिनाम सोहळा!

अशोक आव्हाड
पाथर्डी प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील भगवान गडाच्या पायथ्याशी खरवंडी कासार येथे श्री संत खंडोजी बाबा यांच्या 18 व्या पुण्यतिथी निमित्त ३ दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहास आज गुरुवारी प्रारंभ झाला
दशनाम संन्यास मठ मुंगूसवाडे महंत शुक्ल भारती महाराज, गुरुवर्य संतोष महाराज भारती, हभप बबन महाराज राठोड, ह भ प श्रीहरी महाराज पंडित, ह भ प विष्णु महाराज आंधळे यांच्या हस्ते कलश पूजन व पुष्पवृष्टी करुन सप्ताहास सुरुवात करण्यात आली
हा अखंड हरिनाम सप्ताह तीन दिवस चालणार असून यामध्ये ह भ प विद्याभूषण सद्गुरु मुकुंद काका जाट देवळेकर, ह भ प महान तपस्वी मौनानंदजी महाराज यांचे जाहीर कीर्तन होणार आहेत यावेळी ह भ प पांडुरंग महाराज राख, मंहत संतोष भारती महाराज, हभप ब्रह्म चंद्रिका ताई पाटील, साल सिद्धेश्वर संस्थान चे हनुमंत महाराज शास्त्री त्यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होईल भगवानगडाचे ह भ प ज्ञानेश्वर महाराज धायगुडे यांचे अमृततुल्य काल्याचे किर्तन होणार आहे
या संपूर्ण अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजक श्री संत, महंत, ह.भ.प. भाविक भक्त यांचे नवनाथभाऊ भगवानराव दहिवाळ व ग्रामस्थ खरवंडी कासार यांच्या वतीने करण्यात येतोभाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे