तेलंगणा चे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची महाराष्ट्रात मोर्चे बांधणी

24 एप्रिल ला औरंगाबाद ला जाहीर सभा
औरंगाबाद – भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची २४ एप्रिलला येथे जाहीर सभा होणार आहे.खासदार बी. बी. पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पक्ष विस्तार, लोकसभा, विधानसभेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत या पक्षाने मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी नांदेड व या जिल्ह्यातील लोह्यात राव यांची जाहीर सभा झाली
आहे. आता तिसरी सभा येथे होत आहे. खासदार पाटील म्हणाले, ‘काँग्रेस, भाजपमुळे शेतकरी, कामगार,
सर्वसामान्यांची उपेक्षाच झाली आहे. या पार्श्वभूमीवर के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणमध्ये अनेक विकासकामे, योजनांद्वारे वेगळी ओळख निर्माण
केली आहे. त्यांची विकासाची दूरदृष्टी बघता अनेक दिग्गज नेते, पदाधिकारी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करत आहेत. या पक्षाने आता महाराष्ट्रामध्ये लक्ष केंद्रित
केले आहे. शेतकऱ्यांसह सर्व क्षेत्रातील विकासाचे ध्येय ठेवून पक्ष वाढीचा प्रयत्न आहे. येथे होणाऱ्या सभेत
मराठवाड्यातील विविध राजकीय पक्ष,संघटनांचे पदाधिकारी ‘बीआरएस’मध्ये प्रवेश करतील’.शेतकऱ्यांचे हित जपणार शेतकरी, कामगार, सर्वसामान्यांचे जीवन समृद्ध करण्याचे काम ‘बीआरएस’ करीत आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी एकरी १० हजार रुपये अनुदान,
चोवीस तास मोफत वीज, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता, शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांचे विमा कवच आदी अनेक शेतकरी हिताचे निर्णय तेलंगण सरकारने
घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही राजकारण बाजूला ठेवून शेतकरी हिताचे काम केले जाईल, असे पक्षाचे आमदार शकील आमिर यांनी सांगितले. आमदार जीवन रेड्डी, किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम, अब्दुल कदीर मौलाना, अभय पाटील चिकटगावकर, प्रदीप साळुंके, वेणू गोपालाचारी उपस्थित होते.