सोशल मीडियावर शुभेच्छांचा गोडवा वाढला!

सादिक शेख
भोकरदन प्रतिनिधी
आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, गुळाचा गोडवा,
स्नेह वाढवा’, “एक तीळ रुसला, फुगला; रडत गुळाच्या पाकात पडला, खटकन हसला, हातावर येताच बोलू लागला, तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ अशा हजारो गुळचट शुभेच्छांनी आज
प्रत्येकाच्या मोबाईलचा चॅटबॉक्स भरला. केवळ शब्दांच्या स्वादिष्ट शुभेच्छा सोशल मीडियाद्वारे देत अनेकांनी शुभेच्छांचा गोडवा वाढविला
आजच्या धावपळीच्या युगात आता प्रत्यक्ष भेटून
शुभेच्छा देण्याची परंपरा संपुष्टात येत आहे तसा अनुभव अनेकांना येऊ लागला आहे आहे
मकर संक्रांतीला .नवीन वर्षाची सुरवात गोडीगुलाबीने व्हावी, यासाठी मकर संक्रांतीचे औचित्य साधले जात असावे. जुनी भांडणे, मतभेद, गैरसमज बाजूला सारून नव्या वर्षात “तिळगूळ घ्या अन् गोड गोड बोला’
असा संदेश संक्रांतीला दिला जातो. या निमित्ताने परस्परांच्या घरातील वेगवेगळ्या चवीचा तिळगूळही खायला मिळतो. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे मोबाईलवरच सुंदर दिसणाऱ्या तिळगुळाच्या आकर्षक छायाचित्रांची कोरडीच चव चाखावी लागत आहे.
सणावाराला सकाळपासूनच प्रत्येकाच्या मोबाईलमधील फेसबुक, व्हॉट्सऍपचा चॅटबॉक्स अशा शुभेच्छांनी भरून जातो आहे. व्हॉट्सऍपवर मकर संक्रांतीनिमित्त आकर्षक स्टिकर्स आणि इमेजेस तयार करून परस्परांना पाठविल्या. त्यामुळे प्रत्यक्षात भेटून तिळगूळ देण्याची परंपरा संपत असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळाले. हीच प्रथा आता प्रत्येक सण उत्सवामध्ये दिसून येत आहे