महाराष्ट्र

अमित शाह पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर!

मुंबई-आगामी 2024 ची निवडणूक मविआ एकत्र लढण्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साशंकता दर्शवली आहे. त्यामुळे राज्यात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

‘एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण इच्छा पुरेशी नसते. जागांच वाटप, त्यामध्ये काही इश्यू. हे अजून केलंच नाही. तर कसं सांगता येईल. मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच काही सांगू शकत नाही.’ असं वक्तव्य शरद पवार यांनी एका दौऱ्यादरम्यान केलं होतं. त्यानंतर शरद पवार भाजप सोबत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान शाह पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. विशेष म्हणजे शाह नागपूर दौऱ्यासाठी येणार आहेत. शहांचा हा नागपूर दौरा तीन महिन्यात दुसरा असल्याने राज्यात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह २७ एप्रिलला येणार आहेत. राष्ट्रीय कॅन्सर रुग्णालयाच्या कार्यक्रमाला उपस्थित लावणरा आहेत. तसेच, गर्दी टाळण्यासाठी आणि उष्णता पाहात कोणतही शक्तीप्रदर्शन करणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button