क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा उद्या ठाणे कारागृहात स्मृतिदिन कार्यक्रम

कल्याण दि .१ मे २०२३
आदीवासी समाजाचे प्रेरणास्थान क्रांतिवीर राघोजी भांगरे यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी व गोरगरीब जनतेला इंग्रज व सावकारांच्या अत्याचार अन्याय व गुलामगिरीच्या जोखडा तुन मुक्त करण्यासाठी अनेक आंदोलने केली लढे उभारले अशा आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना 2 मे 1848 रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात इंग्रजांनी फाशी दिली या घटनेला आज 175 वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने ठाणे येथील कारागृहात 2 मे 2023 रोजी सकाळी 8.30 वाजता त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे
सकाळी 8.30 वाजता राघोजी भांगरे चौक येथे चक्र अर्पण करणे सकाळी नऊ वाजता मध्यवर्ती कारागृह ठाणे येथे वधस्तंभास पुष्पचक्र अर्पण करणे सकाळी 9. 15 वा कारागृहातील फाशी गेटला पुष्पचक्र अर्पण करणे 9.30 वाजता शहीद राघोजी भांगरे चौक ठाणे येथे आदिवासी नेते व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर अभिवादन सभा होणार आहे
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिंगारे ,माजी आमदार वैभवराव पीचड ,ठाणे मनपाचे आयुक्त अभिजीत बांगर ,ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव, कल्याण मनपाचे आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांडगे, आमदार निरंजन डावखरे, आमदार सुभाष भोईर, आमदार विश्वनाथ भोईर ,भिवंडी मनपाचे आयुक्त विजयकुमार मशाल आदिवासी सेवक मंगलदास भवारी ,नगरसेवक डुंबरे विश्वनाथ किरकिरे, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर पिचड ,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लकी भाऊ जाधव, राम साहेब चव्हाण, रामनाथ भोजने लक्ष्मण साबळे , रामू इदे, गोविंद साबळे, पांडू बाबा पारधी ,भारतीताई उंडे, मालू निर्गुडे , संदीप गवारी, गोविंद महाराज जाधव आदींसह अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदे च्या वतीने करण्यात आले आहे