इतर

जादूगार हांडे यांच्या जागतिक विक्रमाची नोंद अकोलेकरांना   अभिमानास्पद !– आमदार डॉ. लहामटे

हांडे फौंडेशनने केली राजमाता जिजाऊ जयंती साजरी


 अकोले प्रतिनिधी


जादूगार पी.बी.हांडे सोशल फौंडेशन सातत्याने विविध  सामाजिक उपक्रम राबवत असते. . दिनांक 12 जानेवारी रोजी भाऊ भिवा हांडे सभाग्रह शिवाजीनगर ,अकोले येथे राष्ट्रमाता ,राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होताराष्ट्रीय एकात्मतेसाठी 36 कि.मी.खोपोली ते पनवेल डोळ्यावर पट्टी बांधून मोटार सायकल चालविण्याचा धाडसी विश्वविक्रम केल्याबद्दल जादूगार हांडे यांचा अकोलेकर नागरिकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी जादूगार हांडे फाऊंडेशनच्या लोकसारथी दिनदर्शिका 2022 चे शानदार प्रकाशन व मान्यवरांचा सन्मान आमदार मा.डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी आमदार किरण लहामटे यांनी जादुगार हांडे फाऊंडेशनचे कार्य , कौतुकास्पद व समाजाभिमुख असल्याचे नमूद केले ,जादूगार हांडे यांची जागतिक विक्रमाची नोंद आम्हा अकोलेकरांना तसेच देशवासीयांना  अभिमानास्पद असल्याचे गौरउद्गागार काढले

.या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व सर्वोदयी कार्यकर्ते भाऊसाहेब मंडलिक ,पिंगळा चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी निवड झाल्याबद्दल उपक्रमशील शिक्षक व प्रबोधन करणारे रमेश खरबस, दर्पण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महादर्पण न्यूजचे संपादक सुनील गीते ,साहित्यिक कवयत्री मंदाकिनी हांडे,यांच्या प्रदीर्घ उल्लेखनीय काव्य सेवेबद्दल तसेचअसाध्य आजारावर मात करून आनंदी जीवन जगणारे   मनोहर तळेकर यांचा स्वच्छतादूत म्हणून यथोचित सन्मान करण्यात आला

.महाराष्ट्र घडविण्यात जिजाऊ माँसाहेब यांचे योगदान या विषयावर  वकील मंगला हांडे यांचे व्याख्यान झाले .मंदाकिनी हांडे यांनी जिजाऊ वंदना व मैत्रीण सांगे मैत्रिणीला सदर गीत सादर करून या काव्याने उपस्थितांची दाद मिळविली. उपक्रमशील शिक्षक रमेश करबस यांनी त्यांच्या कलेची झलक दाखवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. डॉ .संदीप कडलग म्हणाले घराघरात जिजाऊ जन्माला यावी म्हणजे शिवराय जन्माला येतील. दिलीप शेणकर, प्रा विजय भगत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सोहळ्यास प्राध्यापक एस .टी. चासकर, एस .आर .शेटे वकील के.बी हांडे, रवी रुपवते, भास्कर तळेकर, मेजर जगताप ,लेखक व पत्रकार शांताराम गजे ,आर के म्हस्के, इत्यादी मान्यवर उपस्थित होते

या दिमाखदार सोहळ्याचे प्रास्तविक संस्थाध्यक्ष जादूगार पी .बी.हांडे यांनी केले सूत्रसंचालन  प्रशांत धुमाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन राम तळेकर 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button