इतर

जवळेकडलग येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कमानीचे लोकार्पण!

कडलग परिवाराचा पुढाकार

संगमनेर प्रतिनिधी
जवळेकडलग गावचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश कै. अशोक कडलग यांच्या स्मृती प्रित्यर्थ कडलग परिवाराने उभारलेल्या कमानीचे लोकार्पण महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या शुभहस्ते व नाशिक पदवीधर चे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कॉम्रेड कारभारी उगले, कॉम्रेड ज्ञानेश्वर सहाणे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे ,सरपंच पथवे उपसरपंच निलेश कडलग अॅड बाबासाहेब सुर्वे,अशोक राव यांच्या पत्नी अॅड. मीनाक्षी अशोक कडलग व नातेवाईकांच्या, मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य डॉक्टर सुभाष कडलग यांनी केले व कमानीच्या रस्त्याबद्दलची माहिती सांगताना भारतातील अस्तित्वात असलेल्या सर्व राजकीय पक्षांचे नेते जवळे कडलग चे भूषण दिवंगत आमदार कॉम्रेड दत्ता देशमुख यांना भेटण्यासाठी येत त्याबद्दल रस्त्याचे महत्त्व विशद केले. कमानीवर विळा- हातोडा ठेवण्याचा व नामदार साहेबांच्या हस्ते कार्यक्रम करण्याचा उद्देश स्पष्ट केला.
नामदार थोरात साहेब कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना अशोक कडलग बरोबर असलेले संबंधाबाबत माहिती सांगताना कौटुंबिक, राजकीय आठवणींना उजाळा दिला अशोक व त्यांनी केलेले जेलभरो आंदोलन, कॉलेज जीवन व वकिली करतानाचे अनुभव सांगताना उपस्थितांची उत्कंठा वाढवली.
अशोकरावानी न्यायाधीश म्हणून केलेल्या कामाचा विशेष उल्लेख करून त्यांचे निकाल उत्कृष्ट होते ते नंतर बदलू शकले नाहीत याचा अभिमान वाटतो असे सांगून अशोकरावांच्या हुशारीचे कौतुक केले.
माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी कडलग परिवारांनी उभारलेल्या कमानी बाबतचे कौतुक करून कडलग परिवारातील प्रत्येक सदस्याचे आपापल्या क्षेत्रातील कामाच्या कौतुक केले. कमानीकडे पाहून गावातील प्रत्येक तरुण न्यायाधीश साहेबांचा आदर्श घेण्याचा प्रयत्न करून फायदा उठवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जिल्हा न्यायाधीश अशोक कडलग व नारायण गोसावी यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळेस नामदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या हस्ते विशेष चार सत्कार करण्यात आले उपसरपंच निलेश कडलग यांचे मार्केट कमिटीवर निवड तर कमान कॉन्ट्रॅक्टर जनार्दन पवार त्यांना मदत करणारे अरुण थोरात व सरपंच पथवे यांचा सत्कार करण्यात आला. मी
यावेळी पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ यांनी कडलग-रहाटळ एकच परिवार आहे अनेक आठवणींना उजाळा दिला, कॉम्रेड कारभारी उगले यांनीही मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातरे साहेब कारखान्याचे संचालक विनोद हासे, चंद्रकांत कडलग तसेच प्राकृतिक शिक्षण संस्था राजापूरचे अध्यक्ष अॅड अनिल गोडसे, मुख्याध्यापक जिजाबा हासे ,गायछाप कामगार युनियन अध्यक्ष माधव नेहे, जवळे कडलगचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटी पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button