बिंदू माधव जोशी यांनी ग्राहक चळवळ व्यापक केली -रमेश राक्षे

अकोले (प्रतिनिधी) १९८६ ला सर्वात प्रथम तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी लोकसभेत ग्राहक कायदा मंजूर केला. ग्राहक चळवळीचे जनक, थोर स्वातंत्र सेनानी आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे संस्थापक ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी (नाना) यांच्या सांतत्यांच्या प्रयत्नाने ही ग्राहक चळवळ देशभर पोहचली. ग्राहकांच्या प्रश्नांना ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून आवाज उठवून सर्व सामान्यांना न्याय देण्याचे काम केल्याचे स्पष्ट मत अकोले येथे स्व. बिंदू माधव जोशी यांच्या ८ व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा ग्राहक पंचायतीचे जिल्हा सह सचिव रमेश राक्षे यांनी केले. या वेळी माधवराव टिटमे, सचिन जोशी, मच्छिंद्र मंडलिक यांनी जोशी यांच्या जीवनाच्या आठवणींना उजाळा दिला.
या वेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्व. बिंदू माधव जोशी (नाना) व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमचे पूजन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक होते. या वेळी खरेदी विक्री संघाचे नूतन संचालक माधवराव टिटमे, खादी ग्रामोद्योग मंडळाचे संचालक भाऊसाहेब वाकचौरे, सचिन जोशी, ज्येष्ठ पत्रकार निरंजन देशमुख, नरेंद्र देशमुख, अध्यक्ष दत्ता शेनकर, राम रूद्रे, शुभम खर्डे, सुनिल देशमुख सखाहारी पांडे, सुदाम मंडलिक, रामदास पांडे आदी उपस्थित होते.
सुत्र संचालन भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले. आभार राम रूद्रे यांनी मानले.