टोमॅटो च्या सदोष बियाणे मुळे अकोल्यात शेतकऱ्यांना लाखोंचा फटका

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यात सिजेंटा कंपनीचे 62 42 या वाहनात या वनातील सदोष बियाण्यांमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा लाखोचा फटका बसला आहे यामुळे शेतकऱ्यांनी कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे याबाबत शेतकरी लवकरच कृषी मंत्र्यांकडे तक्रार करणार आहे
मौजे कोतुळ, ता. अकोले येथील शेतकरी सचिन भाऊसाहेब गीते यांनी.०.२०आर क्षेत्रात सिजेंन्टा कंपनीचे ६२४२ या जातीचे टॉमेटोचे वानाची लागवड केली , त्यांनी साई समृद्धी रोपवाटीका संगमनेर -कोतुळ रोड, सांगवी, ता. संगमनेर जि.अहमदनगर येथून दि.२६/२/२०२३ रोजी ३४००रोपांची खरेदी केली त्यासाठी त्यांनी रक्कम ५,७००/- मोजली रोपांची लागवड करुन त्यांचा सध्या प्लॉट सुरु झाला परंतू सदर सदोष बियान्या मुळे हे फळ हे विक्रीसाठी मार्केट पर्यंत नेले असता लगेच लुज पडते त्यामुळे व्यापारी मालाकडे पाठ फिरवतो मालाची विक्री होत नाही माल तसाच फेकून द्यावा लागत आहे सदोष बियान्या मुळे फळ विक्री पर्यंत टिकत नाही यामुळे माझा माल विक्री होत नाही.असे श्री सचिन गीते यांनी सांगितले यामुळे अर्थीक १,००,०००/-(एक लाख रुपये) चे नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे
त्यामुळे झालेली नुकसान भरपाई कंपनीकडून मिळावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा श्री सचिन गीते यांनी निवेदनात दिला आहे
राहुरी कृषी विद्यापीठा चे राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तसेच सिजंटा कंपनीचे अधिकारी यांनी सदर तक्रारदार शेतकऱ्यांच्या प्लॉटला भेट देऊन पाहणी केली असून शास्त्रज्ञांचा अहवाल आल्यानंतर नेमके कारण समजू शकेल असे अकोले पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री कोष्टी यांनी सांगितले
दरम्यान सिजेंटा कंपनीचे अधिकारी श्री मदन भांबुर्गे यांचे शी सम्पर्क साधला असता सम्पर्क होऊ शकला नाही
