लेबर 20 च्या माध्यमातून असंघीटत क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार – अनिल ढुमने

पुणे दि २६
जी 20 च्या माध्यमातून विकसनशील देश एकत्र आलेले आहेत, याचे अध्यक्षस्थानी भारत नेतृत्व करित आहे, त्यामुळे भारता कडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा विकसनशील देशांच्या वाढलेल्या आहेत, विकासा मध्ये महत्वपूर्ण योगदान देणारा कामगार, कर्मचारी, असून याचा प्रामुख्याने विचार करण्यासाठी एल 20 अर्तगत कामगारां करिता विविध योजना, कल्याणकारी फायदे, कामगारांची आर्थिक परिस्थिती ऊंचवण्या करिता त्याच प्रमाणे देशभरातील , जगातील संघटित व असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या, सामाजिक सुरक्षा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार एल 20 माध्यमातून प्रयत्नशील राहण्यासाठी सज्ज रहावे असे आवहान भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढुमणे यांनी पुणे येथे आयोजित केलेल्या एल 20 सेमिनार च्या समारोप प्रसंगी केले आहे.
या सेमिनार चे उद्घाटन मराठा चेंबर्स आॅफ काॅमर्स पुणे चे चेअरमन श्री दीपक करंदीकर यांनी केले, मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अभय गीते कामगार ऊपायुक्त पुणे, कामगार कायदे तज्ञ अॅड अशोक गुप्ते, स्मिता वायंगणकर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
मा अॅड अशोक गुप्ते यांनी समाज सुरळीत चालण्याकरिता कायद्याचा धाक, वचक असणे आवश्यक आहे तरच समाजाची प्रगती होवून विकसनशील तुन विकासा कडे जाता येईल. असे मत व्यक्त केले. आज औद्योगिक क्षेत्रात , सेवा क्षेत्रात, महिला, पुरूष एकत्रित काम करीत आहेत , समान वेतन, फायदे मिळवित आहेत ही नक्कीच सकारात्मक बदल आहेत.
समाजातील स्त्री पुरुष असमतोल, असमानता नष्ट झाली पाहिजे, तरच कामगार कायद्यातील तरतूदी चा लाभ होईल अन्यथा अनेक तरतूदी फक्त कागदोपत्री राहतील, महिला समलीकरण करिता शैक्षणिक सुविधा, कौटुंबिक पार्श्वभूमी महत्वपूर्ण असून स्रींच्या विकास मध्ये कुटुंब चा विकास होतो आहे. तसेच विकास तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले आहे.
कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळविण्यासाठी मराठा चेंबर्स आॅफ काॅमर्स अत्यंत आग्रही असुन या बाबतीत एकत्रित काम करण्याचे आश्वासन सेमिनार चे उद्घाटक मराठा चेंबर्स आॅफ काॅमर्स पुणे चे चेअरमन श्री दिपक करंदीकर यांनी दिले आहे.
या सेमिनार मध्ये विविध कामगार संघटनेचे पदाधिकारी किशोर ढोकले, सुनील शिंदे, शरद पंडित, नरेंद्र तांबोळी यांनी मत प्रदर्शन केले आहे. व्यवस्थापनातील वरिष्ठ पदाधिकारी श्री विनायक कडसकर महिंद्रा ग्रुप्स , श्री संतोष जोशी ट्यूब प्रोडक्ट ऑफ इंडिया, श्री विश्वजीत घोष लाओनी कंपनी , श्री साबळे ओरिएंटल रबर इंडस्ट्रीज, महावितरण कंपनी चे ऊप औद्योगिक संबंध अधिकारी श्री शिरीश काटकर, व्यवस्थापन अधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले आहे.
तसेच लेबर लाॅ प्रेटीशन अध्यक्ष अॅड अजय देशपांडे, जेष्ठ अॅड अतुल दिक्षीत, अॅड निर्मल, अॅड मनिषा मोरे, त्याच प्रमाणे व्यवस्थापन सल्लागार श्री व्ही सी गाडगीळ, श्री तानाजीराव घोरपडे, उद्योजक श्री मंदार चितळे हाॅटेल श्रेयस, श्री कल्याण दिक्षित, श्री फारूक शेख, ऊद्योगातील मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोप आभार प्रदर्शन करताना भामसंघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना कामगारांच्या विविध विषयांवर चर्चा, सेमिनार आयोजित करून शोषित पिडीत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत राहीले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले आहे.

सेमिनार चे सुत्रसंचालन भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा सेक्रेटरी बाळासाहेब भुजबळ यांनी केले.
सेमिनार च्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा पदाधिकारी, अभय वर्तक, विवेक ठकार, ऊमेश विस्वाद, अॅड संध्या खरे, अॅड राजेश शाळिग्राम, ,श्री गणेश टिंगरे, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे पदाधिकारी राहूल बोडके, निखील टेकवडे, यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
