जातेगाव येथील श्री. भैरवनाथ मंदिरामध्ये भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

पळवे खुर्द येथील श्री. भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा,
दत्ता ठुबे/ पारनेर प्रतिनिधी :
श्री भैरवनाथ विद्यालय पळवे खुर्द येथे 1990 ला शिकत असलेले विद्यार्थी निरोप समारंभ झाल्यानंतर रविवारी सकाळी ठीक ११:00 वाजता श्री. काळभैरवनाथ मंदिर जातेगाव येथे एकत्रित आले. प्रथमतः सर्वांनी मिळून मंदिर परिसराची साफसफाई केली. त्यानंतर एकत्रित बसून एकमेकांशी संवाद साधला त्यामध्ये असं समजले की प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली कामगिरी बजावत आहेत.कोणी शासकीय कर्मचारी तर काहीजण कंपनीमध्ये कार्यरत आहेत.काही देश सेवा करत आहेत व काही शेतीतसेच दुग्ध व्यवसाय करत आहेत. त्या ठिकाणी एकमेकांच्या ओळखी पटवून झाल्यानंतर हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये सकाळी ठीक 12:00 वाजता श्री. काळभैरवनाथाची महाआरती संपन्न झाली.

यामध्ये विठ्ठल पोटघन,सोमनाथ काळे, कैलास तरटे, दत्तात्रय तरटे, दत्तात्रय कुंजीर सर, सुधाकर वाघमारे, पत्रकार सुदाम दरेकर, अनिल जाधव, सौ. मंगल शेळके, नैनेश ढोरमले, विजय जगताप, सुनील शिंदे सर, दिनेश पोटघन, गंगाधर परांडे तसेच जातेगाव येथील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ बंधू भगिनींच्या उपस्थितीत महाआरती झाल्यानंतर आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर येथील कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल पोटघन यांनी केले तर दत्तात्रय कुंजीर सर यांनी आभार मानले.
