इतर
कोतुळ ते अबिटखिंड जोड ररस्त्याचे डांबरीकरण करा -भाऊसाहेब देशमुख

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ ते अबीतखिंड जोड रस्त्या चे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब भगवंत देशमुख यांनी केली आहे कोतुळ परिसरात दत्तमंदिर इंदिरानगर परिसर विस्तारत आहे सातेवाडी परिसराला जोडणारा कोतुळ दत्तमंदिर विटारी – खराटी मार्गे अबीतखिड जोड रस्ता करावा साधारण 4 ते 5 कि. मी. अंतर असणारा हा रस्ता झाल्यास अबीतखिड ते कोतुळ हे अंतर जवळ येणार आहे या मार्गे मोठी वाहतूक होऊ शकते दूध भाजीपाला, वाहतुकीची शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे आमदार डॉ किरण लहामटे यांनी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन रस्ता करावा अशी मागणी श्री भाऊसाहेब देशमुख यांनी केली आहे