आदिवासी भागात बोहडा लोकसंस्कृतीचे दर्शन कायम – वैभवराव पिचड

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
महाष्ट्रात आदिवासींची गौरवशाली लोकसंस्कृती असून, वैविध्यपूर्ण जीवन संस्कार, प्रथा, परंपरा व उत्सव आजही आदिम संस्कृतीच्या पाऊलखुणा जिवंत असल्याचे चित्र घाटघर, सिंगणवाडी सुरू असलेल्या बोड्यानिमित्त दिसून आले असे मा आ.वैभवराव यांनी व्यक्त केले
मुखवट्यांचे नृत्यनाट्य किंवा मुखवटेधारी सोंग म्हणजे ‘बोहाडा’ हा आदिवासी समाज आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. रात्री या उत्सवाला सुरुवात होते. निसर्गाशी संबंधित अनेक देव-देवतांचे मुखवटे व वेष परिधान करून आदिवासींचे पारंपरिक वाद्य असलेले संबळ व पिपाण्यांच्या तालावर मिरवणूक काढली जाते. काठीला कापड बांधून तयार केलेल्या मशाली पेटवून त्या उजेडात सकाळ होईपर्यंत ही सोंगे नाचवली जातात.
अशाच प्रकारच्या
बोहड्याचे आयोजन घाटघर येथे करण्यात आले होते. गणपतीच्या सोंगापासुन बोहड्याला सुरुवात झाली. त्यानंतर शारदादेवीच्या सोंगाने संबळ वाद्याच्या ठेक्यावर ताल धरला. त्यानंतर खंडेराव, विष्णू, पवन देव, ब्रह्मदेव, बकासूर, नरकासूर, वीरभद्र, वेताळ, बली, पांडवताटी, भीष्म, वाली, सुग्रीव, राम-लक्ष्मण, रावण, अहिरावण- महिरावण, नरकासूर, पुतना मावशी नारद अशा वेगवेगळ्या सोंगांनी आपली कला सादर केली. सकाळी सात वाजता देवीची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष विजय भांगरे सुरज गभाले, गौरव फटांगरे, संतोष सोडणर सिंगणवाडीचे मा सरपंच रामा पोकळे,हिरामण सोनवणे, तसेच घाटघर चे सरपंच लक्ष्मण पोकळे, सोमा केवारी देविदास खडके प्रकाश खडके लक्ष्मण गांगड आधी सह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते