अकोल्याची समिक्षा लगड हिची राज्यस्तरीय हॉकी खेळा साठी निवड .

अकोले /प्रतिनिधी–
सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील राष्ट्रीय शालेय क्रीडा निवड चाचणी कोल्हापुर येथे संपन्न झाली.राष्ट्रीय क्रीडा हॉकी या खेळासाठी १९ वर्षाखालील ( मुली ) या वयोगटात या निवड चाचणीत अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील कन्या कुमारी.समिक्षा रोहिदास लगड या खेळाडूची राज्याच्या टिममध्ये निवड झाली आहे.समिक्षा लगड हि प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी खु,ता. राहाता, जि. अ. नगर येथे इयत्ता ९वी. मध्ये शिकत असून अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा हे तिचे मुळ गाव आहे.समिक्षा लगड हिचे इ.१ली ते ४थी पर्यंतचे शिक्षण अकोले तालुक्यातील न्यु इंग्लिश स्कुल रूंभोडी येथे तर इ.५वी ते ७वी पर्यंतचे शिक्षण अभिनव पब्लीक स्कुल अकोले येथे पुर्ण झाले. यानंतर इ.८वी पासुन प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी खु, ता.राहाता येथे ती शिक्षण घेत आहे. अहमदनगर जिल्हयातुन एकूण पाच खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या पाच पैकी अहमदनगर जिल्हयातुन समिक्षा लगड या एका खेळाडूची राज्याच्या टिममध्ये निवड झाली. हि निवड ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारी आहे.
या खेळाडूला शाळेच्या मुख्याध्यापिका अडेप मॅडम, कॅम्पस डायरेक्टर सरोदे मॅडम,क्रिडा शिक्षिका कडू मॅडम तसेच सर्व शिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. समिक्षाचे वडील रोहिदास लगड हे पिंपळगाव नाकविंदा येथे महालक्ष्मी विदयालयात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून नाईक पदावर काम करतात.ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने घवघवीत यश संपादन केल्याने या नेत्रदिपक कामगिरीबद्दल समिक्षाचे सर्वत्र कौतुक होत आहे.