इतर
सुजित झावरे पाटील यांच्या मध्यस्थीने वडनेर हवेली करांचे उपोषण स्थगित”

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनाबाबत ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी याबाबत सरपंच लहूशेठ भालेकर, उपसरपंच नंदू भालेकर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपोषणास बसले होते. यावेळी मा.कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अहमदनगर यांचे लेखी आश्वासन पत्र घेतल्या नंतर सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. मा.खासदार यांच्या उपस्थितीत बैठक होईपर्यंत उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी राहुल पाटील शिंदे, गणेश शेळके, सुकाशेठ पवार, स्वप्नील घुले, भरत गट, राहुल पवार, ओमकार मावळे, संतोष सरोदे व ग्रामस्थ उपस्थितीत होते.
