इतर

पारनेर तालुक्यातील ११ गावांमध्ये बंद केलेल्या मुक्कामी बस पुर्ववत सुरु !

आमदार निलेश लंके यांचा पाठपुरावा

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी :
सन 2020 पासून पुढील या जैविक महामारीच्या माध्यमातून शासनाने केलेले लॉकडाऊन व तेव्हापासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे आलेली मरगळ व त्यामुळे तोट्यात चाललेले परिवाहन महामंडळ यांनी आपल्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक गावांमधील मुक्कामी बसेस बंद केल्या होत्या. दैनंदिन कामकाजासाठी तसेच उच्च माध्यमिक माध्यमिक व इंग्रजी माध्यमातील पारनेर शहरात असणाऱ्या शाळा व त्या शाळेत शिकणारी विद्यार्थी तसेच पारनेर शहरात असणारे तालुक्यातील तहसील पंचायत समिती कोर्ट -कचेरी यासारखे मध्यवर्ती शासकीय कार्यालयात खेड्यापाड्यातून पारनेरशी दैनंदिन नाळ जोडलेले सर्वाधिक प्रवाशांना तसेच उद्योगधंद्यासाठी आपला व्यवसाय बंद करून आपल्या स्वगृही जाण्यासाठी जाणाऱ्या उद्योजकांना व रात्रीच्या वेळी इतर जिल्ह्यातून येणारे ग्रामस्थ यांना या मुक्कामी गाड्या बंद झाल्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते .
सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या अकरा गावातील पदाधिकारी नेतेमंडळी व ग्रामस्थांनी अनेक वेळा पारनेर नगर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्याशी संपर्क केला होता . व आमदार लंके यांनीही वारंवार पारनेर आगाराचे व्यवस्थापक श्री.कोतकर यांच्याशी संपर्क करून सदर अकरा गावांमध्ये मुक्कामी बस सेवा पूर्ववत करण्याची तोंडी व लेखी स्वरूपात मागणी केली होती. आगार व्यवस्थापक श्री. अमोल कोतकर यांनी सदर गावाच्या मुक्कामी बसेस आपण चालू शैक्षणिक वर्षांपासून दिनांक १५ जून पासून पुन्हा सुरू करत आहोत तसेच विद्यार्थी,विद्यार्थिनी यांनी आपल्या सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थी पासेस त्वरित काढून घेण्याचे आवाहन केले आहे.
पारनेर आगाराचे दोन वाहतूक नियंत्रक सर्व शाळा/महाविद्यालये या ठिकाणी जावून विद्यार्थ्यांना पासेस चे वाटप करणार आहेत,त्यामूळे विद्यार्थ्यांना तासनतास बस स्थानकावर पास काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही तसेच महामंडळातर्फे ७५ वर्ष वरील ज्येष्ठ नागरिक यांना मोफत प्रवास योजनेचा व महिला प्रवासी यांना प्रवासात ५०% सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.कोतकर यांनी केले आहे.

खालील ठिकाणचे एस टी बसचे मुक्काम 3 वर्षानंतर पुन्हा चालू होत आहे.
गाव मुक्कामी एस टी बस गावे पुढीलप्रमाणे
१)वारणवाडी २)कोतुळ
३)जवळा ४)वासुंदे
५)सुरेगाव ६)गुणोरे
७)पिंपरी जलसेन ८)डोंगरवाडी
९)तिखोल १०)कळस
११)वनकुटे
या बस दिनांक 15 जून पासून पूर्ववत होणार असल्यामुळे सदर गावातील व परिसरातील प्रवासी उद्योजक व व्यावसायिक मित्रांनी आमदार निलेश लंके व आगार व्यवस्थापक अमोल कोतकर यांचे आभार मानले आहे.

:
वनकुटे मुक्कामी असणारी पारनेर आगाराच्या या बसच्या माध्यमातून आजवर वनकुटा गावातील अनेक विद्यार्थी अधिकारी व उच्चपदस्थ पदावर काम करत आहे.पारनेर व नगर शहरांमध्ये शिक्षणासाठी किंवा उद्योग व्यवसायासाठी असणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना या बसच्या माध्यमातून रोज घरचा डब्बा मिळत होता व दैनंदिन प्रवास करणाऱ्या माझ्या गावातील प्रवाशांना एक जीवनदायींनी म्हणून ही पारनेर वनकुटे बस बंद झाल्यामुळे माझ्या गावाला व परिसराला पूर्णपणे विस्कळीतपणा आला होता . आज मी वकीली क्षेत्रात कार्यरत आहे ते फक्त पारनेर वनकुटे बस मुळेच .
अॅड राहुल झावरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button