इतर

राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांचा जन्मदिन शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य देत केला साजरा !

दत्ता ठुबे

पारनेर प्रतिनिधी :
देशाला माहितीचा अधिकार तसेच जनलोकपाल विधायका सारखे कायदे करून सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी या वयातही झटणारे पारनेर तालुक्यातील भूषण ,भ्रष्टाचार जन आंदोलनाचे प्रणेते तसेच पाणी आडवा पाणी जिरवा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पारनेर तालुक्याचे नाव देश-विदेशात पोहोचवणारे पद्मविभूषण अण्णासाहेब हजारे यांचा 85 वा वाढदिवस आज राळेगणसिद्धी मध्ये पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य देत साजरा केला.
सैन्य दलात सेवा देत असताना सर्वसामान्य जनतेची होणारी कुचुंबना भ्रष्टाचाराच्या विळख्यात देश अडकला असताना आपणही समाजाची काहीतरी देणे लागतो या भावनेतून अविरत जनसेवा करणारे डॉ. अण्णासाहेब हजारे यांच्या वाढदिवस राळेगण सिद्धी परिवार एक उत्सव म्हणून साजरा करत असतात.
अण्णासाहेब हजारे यांना आदर्श समजून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेले व सामाजिक कार्यात अण्णासाहेब हजारे यांना गुरु मानून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आमदार निलेश लंके यांनी राळेगण सिद्धी येथे जात सालाबाद प्रमाणे अण्णांचा वाढदिवस साजरा केला.
कोरोना काळात व त्यानंतरही आमदार निलेश लंके यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर सामाजिक कार्य चालू असते असे कौतुकांनी सांगत असताना अण्णा म्हणाले की, आमदार निलेश लंके हे माझ्यासारखेच चार भिंतीच्या आत राहून सामान्य नागरिकांसारखा संसार करण्यापेक्षा हे विश्वची माझे घर या उक्ती प्रमाणे पती पत्नी व मुले असा संसार न करता व्यापक समाजकार्य करत संपूर्ण महाराष्ट्रात संसार नव्हे तर प्रपंच करत आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला आहे व माझ्या पारनेर तालुक्याचे नाव देश विदेशात पोहोचवले आहे.
समाज माध्यमांवर मला आमदार निलेश लंके यांचे महाराष्ट्राभर चालु असनारे सामाजीक कार्य पाहुन मला त्यांचा फार अभिमान वाटतो . असे गौरोवउद्गार काढत पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी आमदार निलेश लंके यांच्या सामाजीक कार्याचे कौतुक केले.
अण्णांच्या वाढदिवस समारंभ निमित्ताने आमदार निलेश लंके यांच्या समवेत राळेगणसिद्धी गावचे सरपंच जयसिंग भाऊ मापारी , निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव कारभारी पोटघन मेजर , सुरेश पठारे , भाऊसाहेब साठे , बाळासाहेब कावरे यांच्यासह सामाजिक राजकीय सह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व राळेगणसिद्धी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.


सामाजिक जीवनात काम करत असताना येणाऱ्या अडचणी व अडथळे समोर आल्यावर ज्यावेळेस मी हतबल होतो त्यावेळेस माझे मार्गदर्शक व सामाजिक कार्यातील गुरु असणारे पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांचा चेहरा माझ्यासमोर येतो.मी लहानपणापासून पाहतो आहे की भारताच्या कायदेमंडळात सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अण्णांनी शेकडो आंदोलने , उपोषणे केले आहेत माहितीचा अधिकार , जनलोकपाल सारखे कायदे अमलात आणून तसेच जलसंधारण , पाणी आडवा पाणी जिरवाच्या माध्यमातून राळेगणसिद्धी सारख्या गावात जलक्रांती घडवून आणून संपूर्ण देशात राळेगणसिद्धी पॅटर्न पोचविण्याचे काम केले आहे.
माझ्यासाठी अण्णासाहेब हजारे हे एक ऊर्जास्त्रोत आहेत.या वयातही समाजासाठी असणारी त्यांची तळमळ पाहून मलाही सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळते.अशा या माझ्या दैवताच्या जन्मदिनी प्रत्येक वर्षी मला त्यांचा आशीर्वाद घेण्याची संधी मिळते.माझी परमेश्वरा चरणी एकच प्रार्थना आहे की माझ्या या दैवताला जनसेवा करण्यासाठी उदंड निरागी आयुष्य मिळो व त्यांच्या आयुष्याची शताब्दी साजरी होवो हीच प्रार्थना करतो.
आमदार निलेश लंके

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button