माळीझाप येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव साजरा

अकोले (प्रतिनिधी) अकोले येथिल माळीझाप जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व शैक्षणिक साहित्याचे व जिल्हा परिषदेकडून आलेल्या मुला मुलींचे कपडे (ड्रेस) पुस्तके इत्यादिंचे वाटप करण्यात आले.
तसेच कै. तुकाराम बाबुराव मंडलिक यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पाठीवरील दप्तर , वह्या, रंगपेटी , पाण्याची बाटली, शूज व साॅक्स असे साहित्य मुलांना आमदार डॉ. किरण लहामटे, प्रा. डॉ. विजय भगत , प्रा. रामनाथ काकड, ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष व भाजपचे सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, नगरसेविका विमलताई मंडलिक, मा. नगरसेवक प्रमोद मंडलिक, मुख्याध्यापक अभंग मॅडम, प्रा. बाळासाहेब बनकर , शशिकला मंडलिक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
आमदार डॉ किरण लहामटे यांनी शाळेच्या शिक्षकांचे व ग्रामस्थांचे भरभरून कौतुक केले. या पुढे मीही शाळेला व माळीझाप गावाला आपन सुचवाल ती कामे माझ्या निधितून देण्यात येईल, प्रा. डॉ. विजय भगत, प्रा. रामनाथ काकड, प्रा. बाळासाहेब बनकर, प्रमोद मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी माजी सरपंच उमाजी मंडलिक, भास्कर मंडलिक, गोरख मंडलिक, कैलास मंडलिक, एकनाथ मंडलिक, संगिता मंडलिक बालवाडीच्या शिक्षिका मथुरा चौधरी, रंजना मंडलिक, कविता मंडलिक, रोहिनी मंडलिक, सुभाष पांडे, बाळासाहेब मंडलिक इत्यादी पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय गोडे सर यांनी केले. उपस्थितांचे आभार अशोक मंडलिक यांनी मांडले.
